तरुण भारत

युतीत असताना बाळासाहेब ठाकरे हे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता… : रोहित पवार

ऑनलाईन टीम / मुंबई : 


‘युतीत असताना बाळासाहेब ठाकरे हे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता तुम्ही त्यांच्याकडे फक्त उद्धवजींचे वडील म्हणून पाहता? भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असे ऐकले होते. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला सुनावले आहे.

Advertisements


देश कोरोनाच्या संकटात असताना व राज्यांवर आर्थिक अरिष्ट कोसळले असतानाही दिल्लीत हजारो कोटींच्या नव्या संसद भवनाचे काम सध्या सुरू आहे. रोहित पवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. केंद्र सरकारने प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज आहे, असे मतही व्यक्त केले होते. त्यांच्या या ट्वीटवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती.


मुख्यमंत्री 400 कोटी रुपये खर्चून वडिलांचे स्मारक उभरताय, त्यांना हा प्रश्न विचारा. आपल्या गृहमंत्र्याने फक्त मुंबईतून केलेली वसुली दीड हजार कोटी आहे म्हणतात, ती रक्कम लसीकरणासाठी वळवा, असे भातखळकर म्हणाले होते. त्यांच्या या सल्ल्यावर रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे.


रोहित पवार म्हणाले, कालपर्यंत हिंदुहृदयसम्राट असलेले बाळासाहेब ठाकरे आज भाजपसाठी फक्त उद्धवजींचे वडील आहेत? सत्ता जाताच तुमच्या भावना बदलल्या, असा सणसणीत टोला त्यांनी यावेळी लगावला. 


आपल्या ट्वीटमध्ये रोहित पवार म्हणतात, संसद निश्चित महत्वाची आहे पण आज लोकांचा जीव महत्त्वाचा असल्याने सगळे स्रोत आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकडे वळवणे गरजेचे असताना कोरोनाच्या संकटातही कामगारांना ओढून आणून संसदेचे काम पूर्ण करण्याचा अट्टहास कशासाठी?राज्याची स्थिती नाजूक असतानाही राज्याने लसीकरणाचा भार उचलण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारप्रमाणे लसीकरणाची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलली नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

Related Stories

सांगली : माजी महापौर हारुणभाई शिकलगार यांचे निधन

Abhijeet Shinde

केरळ : पायलटच्या सतर्कतेमुळे बचावले 104 प्रवाशी

datta jadhav

“आता मी देखील करेक्ट कार्यक्रम करणार”; राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला इशारा

Abhijeet Shinde

वाई तालुक्यात नव्याने 81 जण बाधित

Patil_p

घरात कोण आजारी हाय काय ?

Abhijeet Shinde

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 2.40 कोटींवर

datta jadhav
error: Content is protected !!