तरुण भारत

देशाचे माजी ॲटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनाने निधन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :   

देशाचे माजी ॲटॉर्नी जनरल पद्मविभूषण सोली सोराबजी यांचे कोरोनाने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादररम्यान, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.  

Advertisements

1930 साली मुंबईत सोराबजी यांचा जन्म झाला. 1953 मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकीली सुरू केली. 1971 ते सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील बनले. 1998 ते 2004 पर्यंत ते मानवाधिकार प्रोत्साहन व संरक्षण या विषयावर यूएन-सब कमिशनचे सदस्य आणि नंतर ते अध्यक्ष बनले. त्यांनी हेग येथेही 2000 ते 2006 पर्यंत लवादाचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. एक तत्वनिष्ठ आणि मधुर व्यक्तीमत्व अशी ओळख असलेले सोराबजी 1989-90 आणि 1998-2004 या काळात दोन वेळा देशाचे ॲटॉर्नी जनरल हेते.  

स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचे संरक्षण यामध्ये उल्लेखनीय काम केल्याने सोराबजी यांना मार्च 2002 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Related Stories

भारतात कोरोनाबाधितांची संख्या 14 लाखांवर

datta jadhav

अमेरिका 8 देशांवरील प्रवासबंदी उठविणार

Patil_p

ओबीसी आरक्षण : छगन भुजबळांच्या भेटीबाबत फडणवीसांनी केला खुलासा

Abhijeet Shinde

निकालावेळी जल्लोष अन् मिरवणुकीवर बंदी

Patil_p

डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे वाढली चिंता

Patil_p

45 वर्षापुढील व्यक्ती,कोविड योद्धे लसीकरण केंद्रात जाऊन दुसरा डोस घेऊ शकतात-किशोरी पेडणेकर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!