तरुण भारत

”1 मे नंतर लसीकरण केंद्रांवरुन लोकांना घरी पाठवण्यात आलं तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?”

नवी दिल्ली / ऑनलाईन टीम

केंद्र सरकारने 1 मे पासून 18 वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणाची परवानगी दिली आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकार आवाहन करत असताना दुसरीकडे अनेक राज्यांनी लसींचा तुटवडा असल्याची तक्रार केली आहे. यावरूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना आव्हान दिले आहे.

पी चिदंबरम यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांची 1 मे रोजी कसोटी असेल. राज्यांकडे लसींचा मुबलक साठा असल्याचा त्यांचा आणि त्यांच्या सरकारचा दावा हवेत उडून जाईल.


पी चिदंबरम यांनी यावेळी कोणतंही राज्य 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी अद्याप तयार नसल्याचा दावा केला. इतकंच नाही तर कोवीन अॅपही सहकार्य करत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. जर लस नाही म्हणून 1 मे नंतर लसीकरण केंद्रांवरुन लोकांना घरी पाठवण्यात आलं तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?, अशी विचारणा पी चिदंबरम यांनी केली आहे.

Advertisements

Related Stories

सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात

Abhijeet Shinde

‘कलम 370’साठी संघर्ष सुरूच ठेवणार : मुफ्ती

Omkar B

बुद्धदेव भट्टाचार्य यांची प्रकृती बिघडली

Patil_p

काँग्रेस कमकुवत, झोपेतून जागं व्हावं लागेल

Patil_p

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाला प्रारंभ

Patil_p

मुंबई पोलीस आयुक्तांची बदनामी केल्याप्रकरणी 2 गुन्हे दाखल : रश्मी करंदीकर

Rohan_P
error: Content is protected !!