तरुण भारत

वाई, खंडाळा, महाबळेश्वर रस्त्यांसाठी 7 कोटी 3 लाखांचा निधी मंजूर

वाई : वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते  लोकांच्या सोयीस्कर  व्हावेत व दळणवळण सुरळीत व्हावे यासाठी जिल्हा नियोजन आराखडयातील इतर जिल्हा मार्ग विकास  मजबुतीकरण व ग्रामीण मार्ग विकास मजबुतीकरण तसेच राज्य  शासनाकडील विशेष दुरुस्ती योजनेअंतर्गत विविध रस्त्यांच्या कामासाठी 7 कोटी  3 लाख मंजूर केल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली . 

वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील वाहतूकीची सुविधा अधिक सुरळीत व्हावी , ग्रामीण भागातील लोकांच्या दळणवळणाचा मार्ग सुखर व्हावा यासाठी मतदारसंघातील  खराब झालेले रस्ते  चांगले बनविण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी जिल्हा व  राज्य स्तरावर  प्रयत्न  करुन याकामांस निधी उपलब्ध करुन घेतला आहे.             

Advertisements

या मंजुर कामांमध्ये वाई तालुक्यातील  : कुसगांव ते विठ्ठलवाडी रस्ता  (रु.8 लाख), आसले  पिराचीवाडी रस्ता (रु.10लाख), इजिमा-37 ते कोंढावळे  रस्ता (रु.10लाख), निकमवाडी पोहच रस्ता (रु.10 लाख), इजिमा 33 ते वाकेश्वर (बावधन) रस्ता (रु.10लाख), आकोशी जोडरस्ता (रु.7 लाख), अभेपुरी पाचपुतेवाडी रस्ता (रु.10 लाख), सुरुर मोहोडेकरवाडी रस्ता  (रु.15 लाख), वरची बेलमाची ते  काळंगवाडी रस्ता  (रु.15 लाख), कणूर ते नागेवाडी रस्ता (रु.15लाख), हायवे ते पाचवड गाव  रस्ता (रु.15लाख), इजिमा-37 ते तुपेवाडी रस्ता (रु.15 लाख),      भुईंज चाहूर वरचे रस्ता (रु.25 लाख),        

खंडाळा तालुक्यातील :- शिवाजीनगर तोंडल रस्ता (रु.17 लाख), भादे ते वीरधरण रस्ता  (रु.17लाख), रामा 117 ते बाळुपाटलाचीवाडी धायगुडे मळा रस्ता (रु.17लाख), वडगांव रेसकोर्स रस्ता , मोर्वे बिरोबावस्ती ते प्र.रामा-15 रस्ता  (रु.17 लाख), अहिरे घाटदरे रस्ता (रु.17लाख),  शिरवळ  ते भाऊनगर रस्ता  (रु.50लाख),  जवळे ते कर्नवडी रस्ता  (रु.80 लाख), कवठे ते चाहुरवस्ती रस्ता (रु.80 लाख),

त्याचप्रमाणे महाबळेश्वर तालुक्यातील :-  वेंगळे वाघेरा रस्ता (रु.10लाख),ग्रा.मा.32 ते भिलार भुतेश्वर मंदिर रस्ता  (रु.10 लाख),भिलार कुंबळजाई मंदिर रस्ता  (रु.10 लाख), कुरोशी ते  वारणेवस्ती रस्त  (रु.15 लाख), प्रजिमा 15 ते अवकाळी  रस्ता  (रु.15 लाख), माचुतर जोडरस्ता (रु.15 लाख), भेकवलीवाडी जोड रस्ता  (रु.16 लाख), घावरी येर्णे रस्ता (रु.15 लाख), मांघर ते प्रजिमा 26  रस्ता (रु.16लाख), तसेच राज्य शासनाकडील विशेष दुरुस्ती अंतर्गत  मंजुर रस्ते :- वाई तालुक्यातील कणूर नागेवाडी  रस्ता सुधारणा करणे. (रु.50लाख), वरची बेलमाची ते काळगंवाडी गांव रस्ता (रु.25लाख), खंडाळा तालुक्यातील :- अतिट ते चव्हाणवस्ती रस्ता (रु.30 लाख) या मंजुर  झालेल्या रस्त्यांसाठी व यापुर्वी अर्थसंकल्पामध्ये ही वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील रस्त्यांसाठी 133 कोटी 90 लाख मंजुर केले असल्याने जनतेमधून समाधान  व्यक्त होत आहे.

Related Stories

राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत सुशांत जेधेला रौप्यपदक

Patil_p

साताऱ्यात आज ७ नागरिकांना डिस्चार्ज तर १२६ नमुने पाठवले तपासणीला

Abhijeet Shinde

वयोवृद्ध महिलेस नगराध्यक्षांचा मायेचा आधार

Patil_p

सातारा : राजवाडा-नगरपालिका रस्त्याचे डांबरीकरण

datta jadhav

”आरक्षण मुद्यावरुन केंद्र सरकारला पळ काढता येणार नाही”

Abhijeet Shinde

झोपडपट्टी सुरक्षा दलाकडून शेतकरी आंदोलनास पाठिंबा

Patil_p
error: Content is protected !!