तरुण भारत

चला मुलांनो घरबसल्या पुस्तक वाचू या !

  • रंगावलीभोवती ५ हजार पुस्तकांच्या पूजनाने प्रारंभ  

ऑनलाईन टीम / पुणे :

 कोविड काळात शाळा नाही, खेळ नाही. ऑनलाईन शिक्षण यात अडकलेली बच्चेकंपनी. सोशल मीडिया व व्हर्चुअल जगातून मुलांना बाहेर कसे काढायचे, या प्रश्नाने हवालदिल झालेले पालक पाहता, मुलांना वाचनासाठी प्रेरित करण्यास हाच काळ योग्य असल्याच्या जाणीवेतून पुण्यातील जय गणेश व्यासपीठांतर्गत असलेल्या गणेश मंडळांनी एकत्र येत चला मुलांनो, पुस्तक वाचू या ! हा उपक्रम हाती घेतला आहे. 

Advertisements


अप्पा बळवंत चौकातील नू.म.वि. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात रंगावलीभोवती मांडलेल्या ५ हजार पुस्तकांच्या पूजनाने या उपक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळीचे सदस्य अ‍ॅड. मिहिर प्रभुदेसाई, पराग ठाकूर, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, शिरीष मोहिते, पीयुष शाह आदी उपस्थित होते. शहराच्या विविध भागांतील मंडळे घरोघरी जाऊन मुलांना ही पुस्तके विनामूल्य देणार आहेत.

कार्यक्रमाची संकल्पना पीयुष शाह आणि शिरीष मोहिते यांची होती.मोबाईल आणि टिव्हीपेक्षा मुलांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी शहरातील विविध भागातील गणेश मंडळानी यामाध्यमातून पुढाकार घेतला आहे. यात मुलांना आवडतील अशा ज्ञान व मनोरंजनात्मक जादूच्या गोष्टी, साहस कथा, शौर्य कथा, राष्ट्रभक्त, क्रांतिकारकांच्या गोष्टींबरोबरच अभ्यासपूरक प्रकल्पांसाठीच्या पुस्तकांचाही समावेश आहे. ज्या मुला-मुलींना पुस्तके हवी आहेत, त्यांनी ९८२३०२३०२१, ८८८८७७९३९३ या क्रमांकावर फोन न करता केवळ वॉटस् अ‍ॅपद्वारे संदेश पाठवून आपले नाव, पत्ता इ. नोंदवायचे आहे. त्यामाहितीद्वारे संबंधित भागातील मंडळाचे कार्यकर्ते मुलांना घरोघरी जाऊन भेट स्वरुपात पुस्तके देणार आहेत.


अ‍ॅड. मिहिर प्रभुदेसाई म्हणाले, कोविडच्या काळात आरोग्यासोबत बौद्धिक उपक्रम देखील गरजेचे आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे घरातील एकमेकांमधील संवाद हरवत चालला आहे. त्यामुळे पुस्तक वाचन व्हायला हवे. पुस्तक वाचनातून बुद्धिमत्ता विकास होतो. तसेच समाजातील ज्ञान देखील मिळते. त्यामुळे हा उपक्रम स्तुत्य आहे, असेही ते म्हणाले. राजीव बर्वे म्हणाले, आज पुस्तकांचा प्रचार करण्याची वेळ आली आहे. वयाने मोठी माणसे वाचत नाहीत, हे दुर्देव आहे. पुस्तके वाचली नाहीत, तर चांगला समाज निर्माण होणार नाही.

Related Stories

मालिका पाहण्यासारख्या हव्यात

prashant_c

बालसाहित्यात भाषा आणि रेषांचा मिलाफ हवा : ल. म. कडू

Rohan_P

‘कै. पं. शंकर विष्णू कान्हेरे स्मृती समारोहा’चे रविवारी आयोजन

prashant_c

पानिपत वीर दमाजीराव गायकवाड यांना अनोखी मानवंदना

prashant_c

पुन्हा एकदा वाढले लखनऊमधील प्रदूषण

Rohan_P

बालविवाह रोखण्यासाठी राजस्थान सरकारची अजब शक्कल

Rohan_P
error: Content is protected !!