तरुण भारत

‘विवोचा व्ही 21’ 5-जी स्मार्टफोन सादर

नवी दिल्ली –

 विवो कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन ‘व्ही 21’ 5-जी स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल केला आहे. सदर स्मार्टफोनमध्ये 44 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तसेच रियर साइडमध्ये 64 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळाला आहे. मीडियाटेक डिमेन्स्टी 800यु प्रोसेसरयुक्त आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,000 एमएएच पॉवरफुल क्षमतेची बॅटरी मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Advertisements

कंपनी दोन स्मार्टफोन सादर करणार असून 8 जीबी रॅम आणि 128 जीबी/256जीबी स्टोरेजमध्ये ते येणार आहेत. यामध्ये 8 जीबी मॉडेलची किमत 29,990 रुपये तर त्याच्या वरच्या मॉडेलची किमत ही 32,990 रुपये राहणार असल्याची माहिती आहे.

विवोच्या नवीन 5 जी स्मार्टफोनचे प्री बुकिंग सुरु झाले असून त्याची विक्री मात्र येत्या 6 मे पासून सुरु होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. यासोबतच हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरही ऑनलाईन स्वरुपात खरेदी करता येणार असल्याचे सांगितले आहे.

Related Stories

फाईव्ह जी टॅबलेट

Omkar B

ऍपल आयफोन 12 ची किंमत

Patil_p

संगणक क्रांतीचे युग

tarunbharat

ई-फसवणुकीपासून सावधान

tarunbharat

मोटो जी 60, मोटो जी 40 फोन दाखल

Patil_p

रियलमी 7 5जी स्मार्टफोन लाँच

Omkar B
error: Content is protected !!