तरुण भारत

कोल्हापूर शहरात भटकी जनावरे पकडण्याची मोहीम सुरू

प्रतिनिधी / कोल्हापूर

शहरातील रस्त्यावर फिरणाऱया भटक्या जनावरांना पकडण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. भटक्या जनावरांमुळे शहरातील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा येत आहे. त्याचबरोबर अपघाताचाही धोका आहे. या विषयी नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर महापालिकेच्या वतीने भटकी जनावरे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली.

Advertisements

भटक्या जनावरांचे मालक पाळलेली जनावरे शहरातील रस्त्यावर सोडतात. ही जनावरे शहरातील मंडई, बाजार पेठांसह  कचरा, कोंडाळा व इतर ठिकाणी मिळणारे खाद्य खाण्यासाठी फिरत असतात. बऱयाचवेळा ही जनावरे शहरातील रस्त्यावर बसून असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या प्रकाराबद्दल नागरिकांच्या असंख्य तक्रारी महापालिकेकडे दाखल झाल्या होत्या. त्यामुळे भटकी जनावरे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. पकडलेली जनावरे पांजरपोळमध्ये जागा उपलब्ध नसल्याने महापालिकेच्या हद्दीबाहेर पाणी व चारा उपलब्ध असणाऱया ठिकाणी सोडण्यात येतील, याची संबंधीतांनी नोंद घ्यावी. भटकी जनावरे पुन्हा रस्त्यावर सोडल्यास संबंधित जनावरे पकडून संबंधीत मालकावर रितसर कार्यवाही करण्यात येईल. तरी स्वमालकीची जनावरे रस्त्यावर सोड नयेत, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

Related Stories

यड्रावमध्ये दारूच्या नशेत युवकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : हॉटस्पॉट सर्वेक्षणात कुंभोजचा समावेश

Abhijeet Shinde

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आता सोशल मिडीयावर

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यातील ५७ गावे वन संरक्षित क्षेत्रात समाविष्ट

Abhijeet Shinde

राज्य सरकारच्या विरोधात लढाईसाठी भाजप सज्ज

Abhijeet Shinde

शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!