तरुण भारत

पत्रकार रोहित सरदाना यांचे हार्ट ऍटॅकने निधन

नवी दिल्ली-

वरिष्ठ पत्रकार आणि हिंदी न्यूज चॅनेल आज तकचे वरिष्ठ अँकर रोहित सरदाना यांचे शुक्रवार, 30 एप्रिल रोजी निधन झाले. कोरोना संसर्गातून सावरल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्मयाने त्यांना मृत्यूने कवटाळले. त्यांच्या निधनावर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. सरदाना हे टीव्हीवरील किंवा न्यूज चॅनेलवरील प्रचलित चेहरा होते. वृत्तवाहिन्यांमधील आघाडीचे पत्रकार आणि अँकर अशी त्यांची ओळख होती. रोहित सरदाना हे 2017 मध्ये ‘आज तक’मध्ये रुजू झाले होते. त्याआधी ते झी न्यूजमध्ये कार्यरत होते. आज तक या हिंदी न्यूज चॅनेलवर ते ‘दंगल’ या एका डिबेट शोचे अँकर होते. रोहित सरदाना यांना 2018 मध्ये गणेश विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Advertisements

Related Stories

आयएएस अधिकारी विजयशंकर यांची आत्महत्या

Patil_p

विरोधकांचे नेतृत्व काँग्रेसचा अधिकार नव्हे

Amit Kulkarni

कोरोना नियंत्रणासाठी त्वरित पावले उचला

Patil_p

टोलप्लाझा चकमकीतील ट्रकचालक पुलवामातील दहशतवाद्याचा भाऊ

Patil_p

कोरोना : दिल्लीत 246 नवे रुग्ण; 8 मृत्यू

Rohan_P

लडाखमध्ये युद्धाच्या उंबरठय़ावर होता भारत

Amit Kulkarni
error: Content is protected !!