तरुण भारत

फोंडय़ात लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद

लॉकडाऊनचे नियम धाब्यावर : मासळी मार्केटात गर्दी, कपडय़ाचे दुकानही खुले

प्रतिनिधी / फोंडा

Advertisements

राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनबद्दल मार्गदर्शक तत्वाचे पालन करताना कोणती दुकाने खुली अन् कोणती दुकाने बंद ठेवावी असा सभ्रम काही व्यापाऱयामध्ये फोंडय़ात दिसून आला. फोंडा शहरातील बरेच व्यापाऱयांनी आपली दुकाने बंद ठेवून लॉकडाऊनचा नियम पाळला. मात्र फोंडय़ातील एक कपडय़ाचे दुकान व दोन दारूची बार याला अपवाद ठरली. तसेच मासळी बाजारात गर्दी करून ग्राहक मासळी खरेदी करताना आढळल्याने फोंडय़ात दिवसभर ग्राहकांची रेलचेल सुरू होती. पोलिसांनाही यावर नियंत्रण ठेवताना नाकीनऊ आले.

फोंडय़ात मार्केट परिसरात नियंत्रण गरजेचे

   आज फोंडय़ात शनिवारचा आठवडी बाजारतही अशीच परिस्थिती कायम राहिल्यास लॉकडाऊचे नियम धाब्यावर बसून व्यापार करण्याचे चित्र पाहायला मिळेल. सरकारी यंत्रणांचे मात्र त्यावर कुठलेच नियंत्रण राहिलेले नाही. व्यापारी व ग्राहकांची ही बेफिकिरी कोरोना संसर्गासाठी घातक असल्याच्या प्रतिक्रिया काही सुज्ञ नागरिकांकडून ऐकायला मिळाल्या. लॉकडाऊनच्या काळात सामान्य जनेतला जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा भासू नये यासाठी सरकारने काही नियम शिथिल केले खरे मात्र नेमके तेच नियम लॉकडाऊनच्या काळात कोरोना संसर्ग वाढविण्यात कारणीभूत ठरणार आहेत. मार्केट परिसरात दुतर्फा चारचाकीवाहनावर फळविक्रेत्यांची रांग लागलेली होती. तसेच येथे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. फोंडय़ातील दादा वैद्य चौक व जुने बसस्थानक परिसरात मात्र शुकशुकाट पसरला होता. जीवनाश्यक वस्तूच्या खरेदीसाठी  सरकारने दिलेली मूभा हीच सद्या लॉकडाऊन काळात कोरोनाच्या संसर्गासाठी डोकेदुखी ठरणार आहे. पोलिसांतर्फे वांरवार जागृती मोहीम व दंड आकारल्यानंतरही फोंडा मार्केट परिसरात परिस्थितीवर नियंत्रण येत नाही. 

फोंडा पोलिसातर्फे पाच ठिकाणी नाकाबंदी

 फेंडय़ात एकूण पाच ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे. फर्मागुडी, बाणस्तारी, बोरी सर्कल, वरचा बाजार फोंडा व शहर परिसरात ही नाकाबंदी करण्यात आलेली आहे. विनाकारण फिरणाऱयावर वाहतूक पोलिसांचीही करडी नजर असतानाही काही नागरिक कारणाशिवाय बाहेर फिरत होते. अत्यावश्यक सेवेसाठी गोवा बागायतदार बाझाराचे दालन सुरू होते मात्र यावेळी गर्दीवर नियंत्रण होते. लॉकडाऊनचा फायदा उठवित बाजारपेठेतील बऱयाच व्यापाऱयांनी भाजी, फळे विकण्याचा व्यापार रस्त्यावर ठाण मांडलेला आहे, याकडेही उपजिल्हाधिकाऱयांनी नजर ठेवणे गरजेचे आहे. कदंब बसेस फोंडा शहरात अधूनमधून सेवा देत होते. त्यामुळे कदंब बसेससाठी जुने बसस्थानक परिसरात प्रवाशी ताटकळत वाट बघत राहिलेले चित्र दिसत होते.

 फोंडय़ात जंतूनाशक फवारणी धिम्या गतीने

कोरोनाच्या दुसऱया लाटेत कोरोनाबाधितांचा आकडय़ात झपाटय़ाने वाढ होत असताना मात्र अग्निशामक दलातर्फे जंतूनाशक फवारणीचे काम जोर धरत नसल्याचे आढळले आहे. मागील लॉकडाऊनच्या काळात कोरोना संसर्ग प्रतिबंधक फवारणी मोहीमेअंतर्गत फोंडा अग्निशमन दलातर्फे पोलीस स्थानक, बसस्थानक, मार्केट परिसरात, तसेच फोंडा पालिका क्षेत्रात फवारणी सत्र आरंभले होते. कोरोनाच्या दुसऱया लाटेत मात्र अजूनपर्यंत जंतू प्रतिबंधक फवारणीवर सरकारने भर दिलेला नाही.

माशेल परिसरात लॉकडाऊनतही ग्राहकांची रेलचेल

माशेल परिसरातही लॉकडाऊनला व्यापारी व ग्राहकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. भाजी व मासळी मार्केटात ग्राहकांची झुंबड उडाली होती. व्हॉलसेल दारूची दुकानावर ग्राहकांनी गर्दी केली होती. लॉकडाऊन आणखी पंधरा दिवसांनी वाढल्याच्या अफवेनंतर गर्दीत आणखी भर झालेली आढळली. माशेल परिसरात लॉकडाऊनातही ग्राहकांची रेलचेल सुरू होती. नागरिकांनी वाढत्या कोरोनाच्या संसर्गात विनाकारण सार्वजनिक ठाकणी फिरण्याचा मोह आवरणे अंत्यत आवश्यक आहे.

Related Stories

‘आयसीजीएस सार्थक’ भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात सामील दलाचे महासंचालक के. नटराजन यांच्या हस्ते जहाजाचे गोवा शिपयार्डमध्ये प्रवर्तीकरण

Omkar B

आरिदानेच्या गोलमुळे हैदराबाद एफसीने ईस्ट बंगालला बरोबरीत रोखले

Amit Kulkarni

मुरमुणे गुळेलीत पाणीपुरवठा सुरळीत करा

Amit Kulkarni

म्हापशातून एकूण 35 अर्ज दाखल

Amit Kulkarni

गोवा : काँग्रेसकडून आलेक्स रेजिनाल्ड यांचा पत्ता कट

Sumit Tambekar

सरकारने ऊस शेतकऱयांचे हित सांभाळले : केपेकर

Omkar B
error: Content is protected !!