तरुण भारत

विवाह सोहळय़ांच्या परवानगीसाठी गर्दी

वर्दळ सुरूच; कोरोना नियमांचा फज्जा

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

विवाह सोहळे व इतर कार्यक्रमांसाठी शासनाने परवानगी बंधनकारक केली आहे. त्यामुळे तहसीलदार कार्यालयात परवानगी मिळविण्यासाठी संबंधितांची वर्दळ वाढत आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे लागू केलेल्या नियमामुळे वधू व वर पक्षाकडील मंडळींची धावपळ सुरू आहे. तालुक्मयातील नागरिकांना तहसीलदार कार्यालयात परवानगी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत मागील आठ दिवसांत 700 हून नागरिकांनी परवानगी मिळविली आहे.

वाढत्या कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे मंगळवारी रात्रीपासून राज्यात क्लोजडाऊनचा नियम जारी करण्यात आला आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील तहसीलदार कार्यालयात परवानगी देण्याचे काम सुरू ठेवण्यात आले आहे. मात्र पास मिळविण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याने धोका निर्माण झाला आहे. परवानगी मिळविण्यासाठी तहसीलदार कार्यालयात गर्दी होत असल्याने सामाजिक अंतराचा देखील फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे.

तालुक्मयातील वेगवेगळय़ा गावांतून नागरिक लग्न कार्याच्या परवानगीसाठी तहसीलदार कार्यालयाकडे धाव घेत आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे सामाजिक अंतराचा फज्जा उडत आहे. मागील काही दिवसांपासून तहसीलदार कार्यालयात लग्न सोहळय़ांच्या परवानगीसाठी वर्दळ दिसून येत आहे. प्रशासनाने विवाह सोहळय़ाला परवानगीची अट घातल्याने कागदपत्रे जमा करण्यासाठी संबंधितांची धावपळ होत आहे.

Related Stories

कोरोना संकटामुळे पूरग्रस्त अडचणीत

Patil_p

सोमवारी 769 रुग्ण कोरोनामुक्त

Amit Kulkarni

शनि मंदिरसमोर वाहतूक कोंडी

Amit Kulkarni

शॉटकॉन कराटे डू स्पोर्ट्स अकॅडमीचे सुयश

Amit Kulkarni

नंदगड येथे समाज विज्ञान विषयाची कार्यशाळा

Omkar B

कुडचडेतील ‘मनिग्राम’ कार्यालयात पुन्हा चोरी

Patil_p
error: Content is protected !!