तरुण भारत

स्मार्ट सिटीचे वरातीमागून घोडे

महांतेशनगर येथे कॉंक्रिटच्या रस्त्याची खोदाई

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

महांतेशनगर येथील मुख्य मार्गाचे कॉंक्रिटीकरण व इतर काम पूर्ण करून दोन महिने झाले. रस्ता पूर्ण झाल्यानंतर चेंबरसाठी पुन्हा रस्त्यावर खोदाई करण्यात आली आहे. केलेल्या रस्त्याची काही दिवसांमध्येच खोदाई करण्यात आल्याने स्मार्ट सिटीच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यामुळे बेळगावमध्ये स्मार्ट सिटीचे वरातीमागून घोडे का? असा प्रश्न केला जात आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील रस्त्यांचे व्हाईट टॉपिंग केले जात आहे. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासोबतच गटारी, फूटपाथ यांची व्यवस्था करण्यात येत आहे. परंतु हे काम करताना योग्य नियोजन नसल्याने एकच काम पुन्हा पुन्हा करण्याची वेळ येत आहे. स्मार्ट सिटीची ड्रीम प्रोजेक्ट असणाऱया केपीटीसीएल रोडवर काही दिवसांपूर्वी खोदाई करून पुन्हा रस्ता करण्यात आला होता. वडगाव आदर्शनगर येथेही पाण्याच्या गळतीमुळे रस्त्याची खोदाई करण्यात आली होती.

महांतेशनगर येथे मागील काही वर्षांपासून रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू होते. दोन महिन्यांपूर्वी हे काम पूर्ण करण्यात आले असून रंगकामही करण्यात आले आहे. रस्त्यामध्ये असणाऱया चेंबरसाठी हा रस्ता पुन्हा खोदण्यात आला आहे. नुकताच पूर्ण झालेला रस्त्या खोदण्यात आल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Related Stories

मालवाहतूक आजपासून पुन्हा सुरू होणार

Patil_p

कडक लॉकडाऊननंतर पुन्हा खरेदीसाठी गर्दी

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यातील बंधारे-पुलांवरील पाण्याची पातळी ओसरली

Amit Kulkarni

वीरमदकरी जयंतीला सुट्टी जाहीर करा

Patil_p

गुंजीत गटारी स्वच्छ : गाळ-कचरा रस्त्यावर

Amit Kulkarni

बेळगाव-तिरुपती विमानसेवा लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!