तरुण भारत

नाल्याची स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष

जुन्या गांधीनगरातील नाल्यात प्लास्टिक कचरा अडकल्यामुळे सांडपाणी वाहण्यास अडथळा

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

नाल्याची साफसफाई वेळेवर न केल्याने समस्या निर्माण झाली आहे. येथील जुन्या गांधीनगर राईस मिलशेजारील नाल्यात प्लास्टिक कचरा अडकल्यामुळे नाल्यातील सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. परिणामी येथील नागरिकांची डोकेदुखी वाढली असून नाल्याचे पाणी तुंबून राहत असल्याने  परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

येथील नाल्याची स्वच्छता करण्याकडे कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. प्रत्येक दोन महिन्यांतून येथील नाल्याची स्वच्छता करणे गरजेचे आहे. मात्र सहा महिने उलटून गेले तरी नाल्याची स्वच्छता करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

संपूर्ण गांधीनगरचे सांडपाणी या नाल्यातून राईस मिलच्या बाजूने जाते. तसेच राईस मिलच्या बाजूचा अर्धा नाला हा सुस्थितीत आहे तर पुढील नाल्याच्या बांधकामाची दुर्दशा झाली आहे. नाल्याची भिंत कोसळलेल्या स्थितीत असल्यामुळे सर्व सांडपाणी आजूबाजूच्या परिसरात पसरून दलदल निर्माण होते. परिणामी या भागात डासांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढला असून येथील नागरिकांना डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे.

तसेच दर पावसाळय़ात नाल्यातील सांडपाणी बाहेर येत असून हे सांडपाणी  विहिरींमध्ये झिरपत असल्याने येथील विहिरीही दूषित झाल्या आहेत. त्यामुळे उलटी, जुलाब यासारखे आजारही नागरिकांना होत आहेत. शिवाय नाल्याच्या आजूबाजूने लोकवसती जास्त असल्यामुळे या नाल्याच्या दुर्गंधीमुळे आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे लहान मुलांबरोबरच मोठय़ांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून ही समस्या जैसे थे आहे. त्यामुळे ओल्ड गांधीनगर येथील नाल्याची साफसफाई वेळेवर करण्यात यावी, तसेच कोसळलेल्या नाल्याचे बांधकाम करावे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

Related Stories

चोरीप्रकरणी वडगाव येथील युवकाला अटक

Amit Kulkarni

‘हिडकल’नजीक 200 एकरात हायटेक उद्यान

Amit Kulkarni

ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन वर्गाला अधिक प्रतिसाद

Amit Kulkarni

किम्समध्ये ब्लॅक फंगसच्या 97 रुग्णांवर शस्त्रक्रिया

Amit Kulkarni

खानापुरात भाजपच्यावतीने सुरेश अंगडी यांना श्रद्धांजली

Patil_p

बेनकनहळ्ळी ग्रा.पं.सदस्यांची तरुण भारतला भेट

Patil_p
error: Content is protected !!