तरुण भारत

सर्वा लोकसेवा फौंडेशनतर्फे मास्कचे वितरण

प्रतिनिधी / बेळगाव

पोटासाठी गोरगरीब जनता कोरोनाच्या काळातही बाहेर फिरून आपला उदरनिर्वाह करत आहे. या कामामध्ये त्यांना मास्क घालणे किंवा सोशल डिस्टन्स पाळणेदेखील जमत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे प्लास्टीक तसेच कचरा गोळा करणाऱया गणेशपूर येथील महिलांना सर्वा लोकसेवा फौंडेशनचे वीरेश हिरेमठ यांनी मास्कचे वितरण केले आहे. यावेळी त्या महिलांना मास्क वापरा, तसेच सोशल डिस्टन्सही ठेवा, असे आवाहन हिरेमठ यांनी केले. गणेशपूर येथील हा समाज प्लास्टीक तसेच इतर कचरा गोळा करत असतो. पोटासाठी सकाळपासूनच शहरासह उपनगरांमध्ये या महिला फिरत असतात. मात्र त्यांच्या तोंडाला मास्क नसतो. याचबरोबर त्या सोशल डिस्टन्सही पाळू शकत नाहीत. त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी वीरेश हिरेमठ यांनी त्यांना मास्क वाटून कोरोनापासून सावधानता बाळगा, असे आवाहन केले.

Advertisements

Related Stories

ग्रामीणचे मीटर वितरण केंद्र 3 वर्षांपासून बंद

Amit Kulkarni

चंदन तस्कर प्रकरणातील संशयिताला जामीन

Patil_p

हत्ती संशोधक-संरक्षक अजय देसाई यांचे निधन

Patil_p

न्यू गांधीनगर येथील रेल्वेगेट दुरुस्तीमुळे राहणार बंद

Amit Kulkarni

सरस्वती वाचनालयात आजपासून सावरकर स्मृती व्याख्यानमाला

Amit Kulkarni

सॅमसंगतर्फे संतोष दरेकर यांचा गौरव

Patil_p
error: Content is protected !!