तरुण भारत

संकटकाळात रुग्णांना पुरवताहेत मोफत श्वास

तब्बल 5500 ऑक्सिजन सिलिंडर्सचा मोफत पुरवठा :  उद्योजक वेंकटेश पाटील यांचे स्तुत्य मदतकार्य

मनीषा सुभेदार / बेळगाव

Advertisements

कारखान्यातील उत्पादनाची मागणी वाढली की, उद्योजकाला आनंद होतो. परंतु माझ्या कारखान्यातील उत्पादनाला मागणी वाढू नये तर शक्मयतो ही मागणी बंद व्हावी, अशी माझी इच्छा आहे. कारण कोरोनाकाळात माझ्या कारखान्यातील ऑक्सिजन सिलिंडर्सची वाढती मागणी ही काळजी वाटण्याजोगी आहे, हे उद्गार आहेत उद्योजक वेंकटेश पाटील यांचे.

काकती येथे वेंकटेश पाटील यांचा बेळगाव ऑक्सिजन सिलिंडर्स प्रा. लि. हा कारखाना आहे. कोरोनाला प्रारंभ झाल्यापासून आजपर्यंत त्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 5500 सिलिंडर्स विनामूल्य दिले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेतली असता जितकी सिलिंडर्सची मागणी कमी होईल तितका मला आनंद होईल, असे ते म्हणाले.

आपण एखादा उद्योग सुरू करावा, हे स्वप्न त्यांनी विद्यार्थीदशेतच पाहिले. त्यामुळे बिझनेस मॅनेजमेंट डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला असतानाच त्यांनी आपल्या  उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. ऑक्टोबर 1976 मध्ये त्यांनी उद्योग सुरू केला आणि 1977 मध्ये अंतिम परीक्षा दिली. यासाठी त्यांनी कोठेही प्रशिक्षण घेतले नाही. तर हळूहळू मी शिकत गेलो, असे ते म्हणाले.

 सिलिंडर्समध्ये ऑक्सिजन कसा भरला जातो? या प्रश्नावर हवेमध्ये असणारा 20 टक्के ऑक्सिजन प्रक्रियेनंतर बाजूला काढून द्रव स्वरूपात तो 180 सेंटीग्रेड तापमानाला सिलिंडर्समध्ये भरला जातो, असे ते म्हणाले. एका सिलिंडरच्या निर्मितीसाठी 200 रुपये हा किमान खर्च आहे. वाहतूक व अन्य खर्च यामध्ये धरले नाहीत. असे सांगून ते म्हणाले, बेळगावसह गोकाक, जमखंडी येथेही आपण पुरवठा करतो. मात्र वाहतुकीचा खर्च अधिक असल्याने कोल्हापूर आणि कोप्पळ येथेही आपण युनिट सुरू केले आहे.

कारखाने आणि वैद्यकीय व्यवसायाला सिलिंडरची गरज असते. पूर्वी ती किती होती? आज त्याची तीव्रता किती आहे? या प्रश्नावर ते म्हणाले. पूर्वी कारखान्यांना 80 टक्के व वैद्यकीय क्षेत्राला 20 टक्के पुरवठा केला जात होता. मात्र गेल्या 20 दिवसांपासून संपूर्ण भारतातच कारखान्यांना केला जाणारा पुरवठा पूर्णतः थांबविण्यात आला आहे. संपूर्ण उत्पादन वैद्यकीय क्षेत्रासाठीच वापरले जात आहे.

ज्या संस्थांना आपण सिलिंडर पुरवठा केला, त्यांच्याशी संपर्क कसा झाला? या प्रश्नावर आपण स्वतः काही संस्थांना जाऊन भेटी दिल्या व विनामूल्य सिलिंडर पुरवठा करू, असे सांगितले. या संस्थांनी आपल्याकडे लेखी निवेदन दिल्यानंतर त्यांनी दिलेल्या सिलिंडर्समध्ये ऑक्सिजन भरून दिला जातो. आजपर्यंत 5500 ऑक्सिजन सिलिंडर्स भरून दिल्याची माहिती त्यांनी दिली.

….तेव्हा अपार समाधान लाभते!

कोरोनाचा काळ मोठा कठीण आहे. गतवषीपेक्षा यावषी संकट तीव्र झाले आहे. त्यामुळे सिलिंडर्सची मागणी वाढली आहे. याचे दुःख आहे. हे संकट लवकरात लवकर दूर होवो आणि कमीतकमी सिलिंडर्सचा पुरवठा व्हावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. ऑक्सिजन सिलिंडर्स वेळेवर पुरविल्याने रुग्णाचा जीव वाचला असे फोन रुग्णांचे नातेवाईक करतात तेव्हा अपार समाधान लाभते, असे त्यांनी नमूद केले.

Related Stories

सेंट जोसेफ शाळेसमोर राबविली स्वच्छता मोहीम

Amit Kulkarni

कॅसलरॉक येथे रेल्वेद्वारे आलेला दारूसाठा जप्त

Patil_p

13 लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट

Patil_p

कणकुंबीजवळ 6 लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त

Amit Kulkarni

आता कॅनमध्येही मिळणार नाही पेट्रोल

Patil_p

क्वारंटाईनमधून 21 जणांची सुटका

Patil_p
error: Content is protected !!