तरुण भारत

शुक्रवारी जिल्हय़ात 442 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

तालुक्मयातील 151 जणांचा समावेश : कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

शुक्रवारी जिल्हय़ामध्ये 442 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी काही प्रमाणात रुग्णांची संख्या घटली असली तरी भीतीचे वातावरण मात्र कायम आहे. गेल्या चार दिवसांपासून क्लोजडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक जणांनी शहराकडे फिरकणे बंद केले असले तरी खरेदीसाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढतच चालली आहे.

शुक्रवारी शहरामध्ये 127, ग्रामीण भागामध्ये 24 असे एकूण 151 रुग्ण बेळगाव तालुक्मयात आढळून आले आहेत. जिल्हय़ामध्ये 442 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे जनतेने दक्षता घेण्याची गरज आहे. कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढत आहे. कोरोना रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अनेक रुग्ण बरे होत आहेत. तरी देखील या आजारापासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे महत्त्वाचे आहे. शुक्रवारी वेगवेगळय़ा इस्पितळांमधून 281 जण बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. बेळगावात आतापर्यंत 360 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्हय़ामध्ये 3 हजार 54 रुग्ण सक्रिय असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

स्मार्ट सिटीची कामे करण्यास विलंब झाल्याने शहरात अनेक समस्या

Amit Kulkarni

ग्रामीण आमदारांच्या पीएंची ता.पं.फंडात ढवळाढवळ

Amit Kulkarni

बेळगावचा सुपुत्र ऑस्ट्रेलियात अभिनेता

Patil_p

गुंजी परिसरात गवीरेडय़ाकडून भात पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान

Patil_p

मुतग्याजवळ मारहाणीत चार तरुण जखमी

Patil_p

सीईटी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी अधिक दक्ष रहा

Patil_p
error: Content is protected !!