तरुण भारत

कोरोनाच्या कठोर नियमात उद्या मतमोजणी

पोटनिवडणूक मतमोजणीसाठी 34 टेबल : एका विधानसभा मतदारसंघासाठी दोन खोल्या-4 टेबल : पोस्टलसाठी 1 टेबल

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसह आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ यांचे विविध वाहिन्यांनी एक्झिटपोलचे अंदाज जाहीर केले आहेत. त्यामुळे आता साऱयांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सर्व राज्यांसह बेळगावात लोकसभा पोटनिवडणूक निकालाकडे साऱयांचे लक्ष लागले असून याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. देण्यात आलेले एक्झिटपोल खरे ठरणार की त्यांचे अंदाज फोल ठरणार हे त्या दिवशीच्या निकालावर जाहीर होणार आहे. त्यामुळे आता साऱयांचेच लक्ष या निकालाकडे लागून आहे.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे मतदान 17 एप्रिल रोजी पार पडले. या निवडणुकीत 56.02 टक्के मतदान झाले आहे. आता रविवार दि. 2 मे रोजी मतमोजणी होणार असून मतमोजणीची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. एकूण 17 खोल्यांमध्ये 34 टेबल मांडण्यात आले आहेत. या ठिकाणी प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी मतमोजणीचे काम करणार आहेत. एका विधानसभा मतदारसंघासाठी दोन खोल्या, चार टेबल अशी व्यवस्था करण्यात आली असून पहिली फेरी बैलहोंगल मतदारसंघापासून सुरू होणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

जिह्यात एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये एकूण 18 लाख 13 हजार 567 मतदार आहेत. त्यामधील 10 लाख 16 हजार 24 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आता त्याची मतमोजणी होणार असून आरपीडी महाविद्यालय येथे ही मतमोजणी 2 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 यावेळेत होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्व ती दक्षता घेऊनच ही मतमोजणी होणार आहे.

मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम यंत्रे व व्हीव्हीपॅट स्ट्रॉंग रुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. एजंट आल्यानंतरच त्यांच्यासमोर या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे खुली करण्यात येणार आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी तीन कर्मचारी तर एका टेबलवर प्रत्येक उमेदवाराचा एक एजंट असणार आहे. पोस्टल बॅलेटपेपर मतमोजणीसाठी एक स्वतंत्र खोली करून त्या ठिकाणी एकच टेबल ठेवण्यात आला आहे.

बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी अरभावी, गोकाक, बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग हे मतदारसंघ आहेत. या मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता मतमोजणी होणार असून कोण विजयी होणार हे रविवारी समजणार आहे. कोविड मार्गसूचिबाबत निवडणूक आयोगाने गांभीर्य घेतले आहे. मतदान केंद्रामध्ये जाणाऱया प्रत्येकाला कोरोना निगेटिव्ह अहवाल देणे बंधनकारक आहे. निवडणूक अधिकाऱयांसह उमेदवारांचे एजंट आणि पत्रकार यांनाही हा अहवाल द्यावा लागणार आहे. एकूणच कोरोनाची कठोर नियमावली पाळत ही मतमोजणी करावी, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

या निवडणुकीमध्ये म. ए. समितीच्यावतीने शुभम शेळके, भाजपच्या वतीने मंगला अंगडी व काँग्रेसच्या वतीने सतीश जारकीहोळी यांच्यात लढत होणार आहे. एकूण या निवडणुकीत 10 जण रिंगणात आहेत. ही निवडणूक ईव्हीएमच्या माध्यमातून घेण्यात आली असल्यामुळे लवकरात लवकर निकाल बाहेर पडेल, अशी शक्मयता वर्तविण्यात येत आहे. मात्र कोरोनाचे नियम पाळताना साऱयांचीच कसरत होण्याची शक्मयता आहे.

मतदान केंद्रांच्या परिसरात कोणत्याही प्रकारचा जल्लोष यावेळी होणार नाही. कारण मिरवणुकीवरच पूर्ण बंदी आहे. त्यामुळे विजयी झाले तरी अत्यंत शांततेने प्रत्येक उमेदवारासह त्यांच्या समर्थकांनी माघारी फिरायचे आहे. यावेळी मागील वेळेपेक्षा मतदानाचा टक्का घसरला आहे. या घसरलेल्या टक्क्मयाचा लाभ कोणाला होणार हे देखील त्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

5 हजार 831 टपाल मतपत्रिका

या निवडणुकीमध्ये 5,831 टपाल मतपत्रिका आहेत. त्या मतपत्रिकेनंतर 964 इटीबीपीएस मोजले जातील. या टपाल मतपत्रिकेसाठी बेळगाव उपविभागीय सचिव सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम करील, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

सकाळी 6.30 वाजता मतदान केंद्रांवर उपस्थित रहावे

मतमोजणीसाठी एजंट व कर्मचाऱयांनी रविवारी सकाळी 6.30 वाजताच मतमोजणी केंद्रांमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे. कोणतीही घाईगडबड न करता प्रत्येकाने सोशल डिस्टन्स ठेवत आत प्रवेश घ्यायचा आहे. तरी त्याबाबत सर्वांनी दखल घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.

सीसीटीव्हीची राहणार नजर

मतमोजणी केंद्रांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्या कॅमेऱयाच्या माध्यमातून सोशल डिस्टन्स तसेच इतर कामकाजावर नजर ठेवली जाणार आहे. कोणीही हे नियम मोडत असतील तर तातडीने त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

कोविड तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा

कोविड निगेटिव्ह असल्याचा अहवाल आरोग्य विभागाचे अधिकारीच आणि कर्मचारी तपासणार आहेत. याचबरोबर थर्मल स्क्रिनिंग देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे कोविड सेंटरचीही उभारणी करण्यात आली आहे. याचबरोबर प्रत्येक फेरीचा निकाल मोठय़ा स्क्रिनवर प्रदर्शित केला जाणार आहे.

निवडणूक अधिकाऱयांचीही होणार कोविड चाचणी

निवडणूक अधिकारी यांची कोविड चाचणी होणार आहे. त्यांनाही कोविड निगेटिव्ह असल्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांनाही  कोविडची चाचणी करून घ्यावी लागणार आहे. एकूणच कोविडबाबत निवडणूक आयोगाने कठोर मार्गसूची जारी केल्यामुळे अधिकारीही तणावाखाली आहेत.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

आरपीडी महाविद्यालयामध्ये मतमोजणी होणार असून रविवारी हा आरपीडी  रस्ता तसेच गोवावेसकडून तिसऱया रेल्वेगेटला जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. केवळ एजंट, उमेदवार, अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रवेश देण्यात येणार आहे. तेही कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल पाहूनच सर्वांना मुभा देण्यात येणार आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी महाविद्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Related Stories

केंद्र-राज्यातील भाजप सरकार पायउतार होईल

Amit Kulkarni

म्हैसूर विद्यापीठाची के-सेट 21 जून रोजी

Patil_p

दसरा कराटे स्पर्धेत युनिव्हर्सल शुटोकॉन कराटे क्लबला यश

Amit Kulkarni

अकोळ येथे 112 क्रमांकाची जागृती

Patil_p

‘आयएनएस’च्या कार्यकारिणीपदी किरण ठाकूर यांची फेरनिवड

triratna

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱयामुळे भारताचे आर्थिक नुकसान – सीताराम येचुरी यांचा दावा

tarunbharat
error: Content is protected !!