तरुण भारत

अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन

ऑनलाईन टीम / मुंबई :


बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन झाले आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते सेवानिवृत्त लष्करी अधिकारी देखील होते. त्यांना अभिनयाची आवड असल्याने सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 

Advertisements


चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी या संदर्भात माहिती देत अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे.


आज सकाळी कोरोनामुळे अभिनेते मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप वाईट वाटले. ते सेवानिवृत्त लष्करी अधिकारीदेखील होते. त्यांनी बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या होत्या. त्यांच्या कुटुंब आणि मित्रांना मनापासून संवदेना, असे ट्विट अशोक पंडित यांनी केले आहे. 


बिक्रमजीत कंवरपाल 2002 साली मेजरच्या पदावरून सेवानिवृत्त झाले. यानंतर 2003 मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पेज 3, रॉकेट सिंग, आरक्षण, मर्डर 2, 2 स्टेट्स आणि गाझी ॲटॅकसारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.

सिनेमांशिवाय त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे. दीया और बाती हम, ये हैं चाहतें, दिल ही तो है आणि 24 या मालिकांमध्ये काम केले होते. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

Related Stories

ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; रुग्णालयातून डिस्चार्ज

Rohan_P

नकारात्मक प्रतिमेमुळे झाले होते दुःखी

Patil_p

डॉक्टर डॉनमध्ये दिसणार सागर कारंडे

Patil_p

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम ‘या’ अभिनेत्रीचे कोरोनामुळे निधन

Rohan_P

बिग बी यांनी लाडक्या लेकाला अनोख्या अंदाजात दिल्या शुभेच्छा!

Rohan_P

अभिनेत्री श्रिया सरन अनुभवतेय मातृत्व

Patil_p
error: Content is protected !!