तरुण भारत

मोगऱ्याच्या सुवासिक फुलांचा ‘दगडूशेठ गणपतीला’ अभिषेक

ऑनलाईन टीम / पुणे :

शुंडाभूषण, मुकुट, कान व पुष्पवस्त्र परिधान केलेले दगडूशेठच्या गणपती बाप्पाचे विलोभनीय रुप…चाफा, झेंडू, गुलाबासारख्या फुलांनी सजलेला संपूर्ण गाभारा आणि मोगऱ्याच्या सुवासिक फुलांनी दगडूशेठ गणपतीला अभिषेक करण्यात आला. वासंतिक उटी व मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने ही सजावट करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने दर्शन घेतले.

Advertisements

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले आणि सहकाऱ्यांनी ही पुष्परचना केली. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये 200 किलो मोगरा, 1100 चाफ्याची फुले, डच गुलाब, दवणा, टगर, गुलछडी, गावरान गुलाब, झेंडू, ग्रीन पासली आदी प्रकारची शेकडो फुले वापरण्यात आली. तसेच श्रीं च्या चांदीच्या मूर्तीस चंदन, कस्तुरी याच्या उटीचे लेपन करण्यात आले होते.

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, मंदिर बंद असले तरीही दैनंदिन धार्मिक विधी मंदिरात सुरु आहेत. भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. त्याकरीता https://seva.dagdushethganpati.com/fasttrack यावर नोंदणी करावी.

Related Stories

महात्मा फुले

Omkar B

‘दगडूशेठ दत्तमंदिराचा’ पहिला दिवा अनाथांसाठी…

pradnya p

कचरामुक्त शहरांची यादी जाहीर

Patil_p

अंगारकी चतुर्थीला ‘दगडूशेठ’ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद

pradnya p

जागतिक परिचारिका दिन! राहुल गांधी म्हणाले…

pradnya p

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक

pradnya p
error: Content is protected !!