तरुण भारत

रशियातून ‘स्पुटनिक-व्ही’ लस भारतात दाखल

हैदराबाद / वृत्तसंस्था

‘स्पुटनिक-व्ही’ लसीचा साठा घेऊन शनिवारी दुपारी रशियातून पहिले विमान हैदराबादमध्ये दाखल झाले. या ‘स्पुटनिक-व्ही’च्या माध्यमातून भारतामध्ये तिसरी लस उपलब्ध झाली आहे. सध्या भारतात सिरम इन्स्टिटय़ूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस वापरली जात आहे. आता तिसऱया लसीच्या उपलब्धतेमुळे देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता तीन लसींमुळे तिसऱया टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येऊ शकतो. तसेच विदेशातून वैद्यकीय मदत प्राप्त होऊ लागल्यामुळे कोरोना विषाणूविरोधी लढय़ाला आणखी बळ मिळू शकते.

Advertisements

‘स्पुटनिक-व्ही’ लसीची परिमामकारकता 92 टक्के असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतातील दोन्ही लसींची परिणामकारकताही प्रभावी असल्यामुळे कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी या तिन्ही लसी मोठय़ा लाभदायी ठरू शकतील. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. या चर्चेनंतर पंतप्रधानांनी ट्विटरवरून पुतिन यांचे आभार मानले होते. तसेच, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांविषयी मंत्री स्तरावर चर्चा सुरू करण्याचा निर्णय झाल्याचे देखील त्यांनी स्पष्ट पेले होते.

देशात 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र काही ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अडथळे येत आहेत. अशातच स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप भारतात दाखल झाल्याने येत्या काळात लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. भारतात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठय़ा संख्येने वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर देशात ऑक्सिजन, रेमडेसिवीर औषध आणि लसींचा तुटवडा जाणवत असताना जगातील अनेक देशांनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिका, फ्रान्स, युरोप, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, युएई या देशांमधून आता हळूहळू मदत प्राप्तही होऊ लागली आहे.

Related Stories

निकिता तोमर हत्या; दोघे आरोपी दोषी

Patil_p

12 मार्चला क्वाडची पहिली परिषद

Patil_p

उत्तर प्रदेशात कोरोनाचा पहिला बळी

prashant_c

सलग 17 व्या दिवशी इंधन दरवाढ

Patil_p

भारत न डगमगता सर्व संकटांचा सामना करेल

datta jadhav

राहुल गांधींना शाळेत पाठवा! गिरिराज सिंग यांचे संसदेत विधान

Patil_p
error: Content is protected !!