तरुण भारत

मिशन ऑक्सिजनसाठी नौदल सरसावले

नौदलाच्या युद्धनौका झाल्या रवाना

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

भारतीय नौदलाने कोरोनाविरोधी लढाईत यापूर्वीच स्वतःची रुग्णालये, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱयांना तैनात केले आहे आणि आता युद्धनौकाही यात सहभागी झाल्या आहेत. देशातील ऑक्सिजनचा तुटवडा संपविण्यासाठी भारतीय नौदलाने विदेशातून ऑक्सिजन कंटेनर आणण्यासाठी सध्या 7 नौकांना तैनात केले आहे. पहिल्या टप्प्यात नौदलाने आयएनएस कोलकाता, आयएनएस तलवार, आयएनएस जलाश्व, आयएनएस ऐरावत यांना तैनात केले होते. तर दुसऱया टप्प्यात आयएनएस कोची, आयएनएस त्रिखंड आणि आयएनएस तबर यांनाही या कामात सामील पेले आहे.

नौदलाने मागील वर्षी महामारी पाहता भारत सरकारच्या वंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत ऑपरेशन समुद्र सेतू सुरू केले होते. यांतर्गत मालदीव, श्रीलंका आणि इराणमध्ये अडकून पडलेल्या सुमारे 4 हजार भारतीयांना मायदेशी परत आणले गेले होते. तर चालू वर्षात ऑक्सिजन कंटेनर आणि वैद्यकीय सामग्री भारतात आणण्यासाठी नौदलाने ऑपरेशन समुद्र सेतू हाती घेतले आहे. आयएनएस कोलकाता आणि आयएनएस तलवार मोहिमेच्या अंतर्गत फारसच्या उपसागरात तैनात होत्या. त्यांना पहिल्या टप्प्यात 30 एप्रिल रोजी पुरवठा आणण्यासाठी विविध देशांमध्ये पाठविण्यात आले होते.

आयएनएस तलवारला बहारीनच्या मनामा बंदर तर आयएनएस कोलकाताला दोहाच्या दिशेने रवाना करण्यात आले. बहारीनकडून आयएनएस तलवार 40 मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन घेऊन मुंबईसाठी रवाना झाले आहे. तर आयएनएस कोलकाता प्रथम दोहामधून वैद्यकीय सामग्री प्राप्त करत त्यानंतर कुवैतमधून लिक्विड ऑक्सिजन सिलिंडर घेत भारताच्या दिशेने रवाना होणार आहे. याच क्रमात आयएनएस एwरावतही मोहिमेत सामील आहे. तर आयएनएस जलाश्वला दुरुस्तीकार्यातून बाहेर काढत मोहिमेत तैनात करण्यात आले आहे. 

आयएनएस जलाश्वने ऑपरेशन समुद्र सेतून सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. आयएनएस एwरावत सिंगापूरमधून लिक्विड ऑक्सिजनचे कंटेनर घेऊन भारतात परतणार आहे. तर आयएनएस जलाश्वला सरकारच्या आदेशापर्यंत सज्ज ठेवण्यात आले आहे.

नौदलाने दुसऱया टप्प्याच्या अंतर्गत अरबी समुद्रात तैनात आयएनएस कोची, त्रिखंड आणि तबरला त्वरित मोहिमेत सामील केले आहे. याचबरोबर नौदलाच्या दक्षिण कमांडने स्वतःची लँडिंग शिपटँक आयएनएस श्रदुललाही सज्ज ठेवले ओ. केवळ 48 तासांमध्ये कधीच याचा वापर करता येणार आहे. नौदलानुसार गरज भासल्यास आणखीन युद्धनौकांना या मोहिमेत तैनात करता येणार आहे.

Related Stories

छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द नव्हे मंत्र : अमिताभ बच्चन

tarunbharat

भारतावरील निर्बंध, अमेरिकेत मतभेद

Patil_p

पोहायला गेलेल्या दोन मुलांच्या अंगावर विहिरीची दरड कोसळल्याने मृत्यू

Abhijeet Shinde

मडगावातील न्यू मार्केट 31 रोजी खुले होणार

Patil_p

विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स कोसळला

Omkar B

कोल्हापूर : कबनूर गावचा पाणीपुरवठा बंद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!