तरुण भारत

Pandharpur By Election Result 2021 Updates: आवताडेंची आघाडी कायम

पंढरपूर /प्रतिनिधी

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी असा काट्याचा सामना सुरु असून भाजपचे समाधान आवताडे यांनी 29 व्या फेरीअखेर आपली आघाडी कायम राखली आहे. आवताडे यांना 29 व्या फेरीअखेर 6331 मतांनी आघाडी मिळाली आहे.

आवताडे यांची एक एक फेरीत आघाडी कायम असल्याचे या निकालावरुन दिसून येत आहे. मात्र शेवट निकालाची मतदारांना वाट पाहावी लागणार आहे. प्राथमिक फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भगिरथ भालके यांनी आघाडी घेतली होती. यानंतर मात्र आवताडे यांनी बाजी मारत आघाडी घेतली. अत्यंत चुरशीच्या या लढतीत शेवट पर्यंत आवताडे आपली आघाडी कायम ठेवणार काय हे पहावे लागणार आहे.

Advertisements
 • समाधान आवताडे यांना 31 व्या फेरीअखेर 6112 मतांची आघाडी
 • समाधान आवताडेंची 29 व्या फेरीअखेर 6331 मतांनी आघाडी
 • समाधान आवताडे यांना एकविसाव्या फेरीअखेर 3486 मतांची आघाडी
 • अठराव्या फेरीअखेर आवताडे 1209 मतांनी आघाडी
  – सतराव्या फेरीअखेर आवताडे 901 मतांनी आघाडीवर
  – सोळाव्या फेरीअखेर आवताडे यांना 1411 मतांची आघाडी
 • नवव्या फेरी अखेर भाजपचे आवताडे २३५७ मतांनी आघाडीवर
 • आठव्या फेरी अखेर भाजपचे आवताडे २२९५ मतांनी आघाडीवर
 • पाचव्या फेरीत भालके यांना १४७१७ तर आवताडे यांना १४०५९ मते. भालके ६५८ मतांची आघाडी.
 • चौथ्या फेरीत भालके यांना ११ हजार ९४१ तर आवताडे यांना ११ हजार ३०३ मते.
 • तिसऱ्या फेरीत भारत भालके ६३५ मतांनी आघाडीवर. भालके यांना ८६१३ तर आवताडे यांना ७९७८ मते.
 • दुसऱ्या फेरीअखेर भगीरथ भालके यांना ५६०६ तर समाधान आवताडे यांना ५४९२ मते.

पंढरपूर मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. येथे महाविकास आघाडीकडून भालके यांचे पुत्र भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान अवताडे मैदानात आहेत. ही निवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांसाठीही प्रतिष्ठेची आहे. या पोटनिवडणुकीत ५२४ मतदान केंद्रावर २ लाख ३४ हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

Related Stories

बिहारमध्ये असणार दोन उपमुख्यमंत्री

datta jadhav

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 17,920 वर

Rohan_P

फळभाज्यांच्या सालींपासून कागदाची निर्मिती

Patil_p

…अरे बाप्पा सिस्टर हळू.. दानवेंचा ‘तो’ फोटो शेअर करत काँग्रेसचा पलटवार

Abhijeet Shinde

“पंतप्रधान ब्लॅक फंगसशी लढायलासुद्धा टाळ्या-थाळ्या वाजवण्याची घोषणा करतील”

Abhijeet Shinde

कर्नाटकातील ६३० ग्रामपंचायतींमध्ये सुरु होणार नवीन आधार केंद्रे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!