तरुण भारत

Tamilnadu, Kerala, Puducherry Election 2021 Result : पुदुचेरीत NDA आघाडीवर

तामिळनाडूत होणार सत्तापालट

ऑनलाईन टीम / चेन्नई :   

Advertisements

पश्चिम बंगाल बरोबरच आता केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरीतील निकालांचेही चित्र स्पष्ट होत आहे. तामिळनाडूत लोकांनी सत्तांतराला कौल दिला आहे. विरोधी बाकांवरील द्रमुक आता सत्तेत येताना दिसत आहे. तामिळनाडूत 234  जागा असलेल्या विधानसभेत 137 ठिकाणी द्रमुक आघाडीवर आहे. तर अण्णादमुख 96 जागांवर पुढे आहे. एनएमएनने एका जागेवर खाते उघडल्याचे दिसते. तामिळनाडूत बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता असून, द्रमुकने आतापर्यंतच्या कलांनुसार हा आकडा पार केला आहे.  

अण्णाद्रमुकला धोबीपछाड करत द्रमुकने मुसंडी मारल्याने दमुक कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांकडून द्रमुकच्या कार्यालयाबाहेर गर्दी होताना दिसत आहे.

पुदुचेरीत NDA आघाडीवर 

पुदुचेरीत 6 एप्रिलला 30 जागांसाठी विधानसभेची निवडणूक झाली होती. त्याचे निकाल आज हाती येत असून, सुरुवातीच्या कलांनुसार NDA 11 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस आघाडी 5 जागांवर पुढे आहे.
पुदुचेरीत बहुमतासाठी 16 जागांची आवश्यकता आहे. ऑल इंडिया एनआर काँग्रेस-भाजप आणि काँग्रेस-द्रमुक आघाडीमध्ये मुख्य लढत सुरू असून, NDA आघाडीवर आहे. 

काँग्रेसने 2016 मध्ये 15 जागांवर विजय मिळवत DMK आणि मित्रपक्षांसह सरकार स्थापन केले होते. त्यावेळी एआयएनआरसी आणि मित्रपक्षांना केवळ 8 जागा मिळाल्या होत्या. दरम्यान, भाजपमध्ये दोन मंत्री दाखल झाल्यानंतर आणि काही आमदारांच्या राजीनाम्यानंतर फेब्रुवारीमध्ये हे काँग्रेसप्रणित सरकार पडले. मुख्यमंत्री व्ही नारायणसामी त्यावेळी बहुमत सिद्ध करू शकले नव्हते.

Related Stories

धर्मांतर पीडित शीख युवतीचा शीख युवकासोबत विवाह

Patil_p

आपत्कालीन स्थितीत खासगीत उपचाराची सुविधा

Patil_p

सातारा शहर, परिसरात पाच बाधित

Abhijeet Shinde

जम्मू काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P

ईडीची माजी मंत्री रोशन बेग यांच्या बेंगळूर येधील घरावर छापेमारी

Abhijeet Shinde

तर पंतप्रधान मोदींना फासावर लटकवू!

Patil_p
error: Content is protected !!