तरुण भारत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘यंग ब्रिगेड’ला उद्यापासून लस

अखेर मुहूर्त मिळाला 18 ते 44 वयोगटातील लसीकरण, पाच हजार डोस उपलब्ध होणार

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी :

Advertisements

जिल्ह्याला एक-दोन दिवसात कोरोना प्रतिबंधक लसीचे पाच हजार डोस उपलब्ध होणार आहेत. त्यानंतरही टप्प्याटप्याने लस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मंगळवार ४ मेपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली. दरम्यान, ऑनलाईन पोर्टलवर लस उपलब्ध दाखवताच अवघ्या काही मिनिटातच त्याचे बुकिंग संपले आहे.

राज्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांसाठी १ मे २०२१ पासून कोविड -१९ प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याकरिता महाराष्ट्र शासनामार्फत लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी ५ हजार डोस दोन दिवसात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे जिह्यात लसीकरणाला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आरोग्य अधिकारी, कर्मचारी, महसूल व पोलीस अधिकारी व कर्मचारी, ६० वर्षावरील नागरिक आणि त्यानंतर ४४ वर्षावरील नागरिक अशा चार टप्प्यात १ लाख १७ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यानंतर आता पाचव्या टप्प्यात १८ वर्षावरील नागरिकांना लस दिली जाणार आहे.

जिल्ह्यातील आठ तालुक्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी लसीकरण सत्र सुरू होणार आहे. सध्या सुरू असलेल्या ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरण सत्राव्यतिरिक्त हे लसीकरण सत्र आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी कोविन पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करूनच व सत्राची तारीख व वेळ निश्चित करूनच लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी केले आहे.

Related Stories

वेतोरे महाविद्यालयाची मनाली कुबल वेंगुर्ले तालुक्यात प्रथम

Ganeshprasad Gogate

जिह्यात पुन्हा एकदा रूग्णसंख्या पाचशे पार

Patil_p

‘पन्हळे’ची गळती थांबली, वाढत्या भेगांमुळे भीती कायम

Patil_p

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

Abhijeet Shinde

आजीसोबत गावी येताना साहीलवर काळाचा घाला

NIKHIL_N

अग्निशामक केंद्रासह पालिकेची इमारत

NIKHIL_N
error: Content is protected !!