तरुण भारत

तेजस्विनी बनली रक्तदाती

सध्या कोरोनाचा वाढता कहर यामुळे प्रत्येकजण धास्तावलेला आहे.महाराष्ट्रात लॉकडाउन पुन्हा वाढला आहे. लसीकरण मोहीम सुरु झाल्यामुळे लोक लस घेण्यासाठी रांगा लावत आहेत. कलाकार हा आधी एक संवेदनशील माणूस असतो हे वाक्य केवळ म्हणण्यापुरते नाही तर खरोखरच अनेक कलाकार लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. लस घेतल्यानंतर रक्तदान करता येणे शक्य नाही, त्यामुळे सरकारी यंत्रणा रक्तदान करण्याचे आवाहन करत आहे. रक्ताची गरज, साठा आणि पुरवठा याचे गणित बिघडले तर नॉन कोरोना रुग्णांवरील उपचारात अडथळा येऊ शकतो. या सगळय़ाची जाणीव आणि भान असलेल्या कलाकारांमध्ये तेजस्विनी पंडित आहे. म्हणूनच तिने दोन दिवसांपूर्वी रक्तदान केले. यानिमित्ताने तिने सोशल मीडियावर फोटो आणि पोस्ट शेअर केली आहे.

यामध्ये तेजस्विनीने असं म्हटलं आहे की, समाजकारणाचा, समाजसेवेचा कधीच गाजावाजा करु नये असं माझे बाबा म्हणायचे. आरशासमोर उभे राहून अभिमानाने आपली प्रतिमा पाहता आली पाहिजे असे कर्म आपले असले पाहिजे. मात्र आमच्यासारख्या कलाकारांनी काही मदत केली केली आणि ती सोशल मीडियावर शेअर केली की आम्ही ट्रोल होतो. आम्ही हे सगळं प्रसिद्धीसाठी करत असल्याचा ठपका आमच्यावर ठेवला जातो.बाबा म्हणायचे की तुम्ही झाकल्या मुठीने मदत केली तर समाजात इतकी गरज असताना तुम्ही काहीच मदत करत नाही असे लोक म्हणतील. जर केलेली मदत दाखवली तर म्हणतील की तुम्ही पब्लिसिटीसाठीच हे काम केलं. थोडक्यात काय तर बोलणारे बोलत राहणार. समाजकार्य करताना कॅमेरा घरीच ठेवायचा असतो ही शिकवणदेखील मला माझ्या बाबांनी दिली. पण खरं सांगायचे तर जेव्हा लोक कलाकारांकडून होणाऱया मदतीला पब्लिसिटी स्टंटचे लेबल लावतात तेव्हा खूप वाईट वाटतं आणि म्हणूनच आजच्या डिजिटल युगात असे फोटो पोस्ट करावे लागतात.

Advertisements

Related Stories

भार्गवी चिरमुले दिसणार जिजाऊंच्या भूमिकेत

Patil_p

जावेद अख्तर यांचा कंगनाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

Rohan_P

जॅकलिन फर्नांडिस ठेवणार हॉलिवूडमध्ये पाऊल

Patil_p

खिसाच्या दिग्दर्शकाची प्रेरणादायी कहाणी

Patil_p

17 वर्षांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची इच्छापूर्ती

Patil_p

पठाण’मध्ये दीपिकाचे ऍक्शन सीन

Patil_p
error: Content is protected !!