तरुण भारत

पंक्चरमुळे लॉकडाऊन ऑक्सिजनवाहू टॅकरला गावकरने दिला मदतीचा हात

दुचाकी आडवी घालून मागितली मदत

वार्ताहर / माशेल

Advertisements

कोरोना लॉकडाऊनकाळात माशेल येथे पंक्चर स्थितीत अडकलेल्या एका ऑक्सीजनवाहू टॅकरच्या मदतीला धावून येथील स्थानिक विनय गावकर यांनी माणूसकीचे दर्शन घडविले आहे. सदर प्रकार काल रविवारी सकाळी घडला.

प्राप्त माहितीनुसार वेदांता आमोणा येथून एक टॅकर गोवा मेडीकल कॉलेज (जीएमसी)साठी ऑक्सीजन पुरवठा करीत आहे. माशेल येथे पोचला असता त्याचा टायर पंक्चर झाला. मात्र त्याच्याजवळील टायर बदलण्याचा जक नादुरूस्त होता,  त्यात लॉकडाऊनची स्थिती त्यामुळे त्याच्याजवळ स्टेपनी असूनही तो हतबल झाला.  लॉकडाऊनमूळे रस्त्यावर वाहनांची रेलचेलही कमी होती. अधूनमधून जाणाऱया वाहनचालकांकडे हात दाखवून मदत मागितली असता कुणी थांबायला तयार नव्हते.

यावेळी याबाजूने जात असलेले सामाजिक कार्यकर्ते विनय गावकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानी नामी शक्कल लढविताना आपली स्कूटर रस्त्यावर आडवी घातली व रस्त्यावरून जाणाऱया एका अवजड वाहनाला थांबवून त्या ऑक्सिजनवाहू ट्रकला जक उपलब्ध करून दिले. त्यानंतर टायर बदलून टॅकर जीएमसीत रवाना झाला. धाडसी वृत्तीने विनय गावकरने केलेल्या सहकार्यामुळे येथील नागरिकांनी त्याचे कौतुक केले आहे. यावेळी बोलताना गावकर म्हणाले की कोरोना लॉकडाऊनच्या काळात कोणावर कशी परिस्थिती ओढवू शकते प्रत्येकाने आपल्यापरीने कुणा अडलेल्याना मदत करावी असे आवाहन केले. आज देशभरात ऑक्सिजनअभावी लोकांवर प्राण गमविण्यात येत आहे, अशा परिस्थितीत गावकर यांनी जीएमसीत ऑक्सिजन पुरविण्यासाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचलला.

Related Stories

दिल्लीतील विद्यार्थ्यांना दोन दिवसांत गोव्यात आणणार

Omkar B

म्हादईप्रश्नी गोव्यावर अन्याय होऊ देणार नाही

tarunbharat

‘कोव्हिशिल्ड’ डोस गोव्यात दाखल

Patil_p

रस्त्यांवरील खोदकामांमुळे पणजी त्रस्त

Patil_p

हरमल येथे 34.95 लाखाचा चरस जप्त

Patil_p

कॅसिनो स्थलांतराबाबत अद्याप निर्णय नाही

Amit Kulkarni
error: Content is protected !!