तरुण भारत

फोंडय़ात परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी उडविला लॉकडाऊनचा फज्जा

प्रतिनिधी / फोंडा

कोरोनाच्या वाढत्या संक्रमाणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांकडून लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असला, तरी काही परप्रांतीय व्यापाऱयांच्या बेजबाबदार वर्तनामुळे  लॉकडाऊनचा फज्जा उडत आहे. फोंडा मासळी बाजारात रविवारी सकाळी असाच प्रकार पाहायला मिळाला.

Advertisements

 मुख्य बाजारपेठेतील भाजी, फळ व फुलविक्रेत्यांसह सर्व छोटय़ा मोठय़ा व्यापाऱयांनी लॉकडाऊनला सहकार्य करीत शनिवारचा आठवडा बाजार बंद ठेवला. मात्र काही परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी मार्केट प्रकल्पाच्या पार्किंगच्या जागेतच रविवारी बाजार थाटल्याने लोकांची गर्दी उडाली. शुक्रवारपासून जाहीर केलेल्या तीन दिवसांच्या लॉकडाऊनला नागरिकांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे. लॉकडाऊनमधून वगळण्यात आलेल्या बऱयाच व्यावसायिकांनी आपली दुकाने शुक्रवारपासून उघडलेली नाहीत.  फोंडा शहरात रहदारीही मर्यादित प्रमाणात सुरु असून कुठेच फारशी गर्दी दिसून येत नाही. अशा प्रकारे परिस्थिती आटोक्यात असताना व सर्व काही ठिकठाक चाललेले असताना काही परप्रातांतीय व्यापाऱयांनी मात्र लॉकडाऊनचे सोयर सुतक अजिबात बाळगलेले दिसत नाही. शनिवारी फोंडय़ातील आठवडा बाजार बंद ठेवण्याची घोषणा फोंडा पालिकेने करताच, त्याला सर्व व्यापाऱयांनी सहकार्य केले. भाजी, फळविक्रेते, मसाल्याचे व्यापारी यांच्यासह फुलबाजारातील एकही व्यापारी शनिवारी बाजारपेठेत फिरकला नाही. मात्र काही परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी सकाळ उजाडताच आपला बाजार थाटण्याचा खटाटोप सुरु केला. पोलीस व पालिका कर्मचाऱयांनी हस्तक्षेप करीत त्यांना पिटाळून लावावे लागले.

शनिवारनंतर रविवारच्या दिवशीही सकाळी या मासे विक्रेत्यांनी मार्केट प्रकल्पाच्या पार्पिंगमध्ये पुन्हा बाजार थाटल्याने मासे खरेदी करण्यासाठी गर्दी उडाली.  दुपारपर्यंत हा बाजार भरला होता. पोलीस व पालिका कर्मचाऱयांनीही त्याकडे कानाडोळा केल्याने काही जागृत नागरिकांनी त्याबद्दल संताप व्यक्त केला. फोंडा बाजारपेठेत भाजी, फळ, फुलविक्री तसेच मासे विकणारे स्थानिक विक्रेते परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तीन दिवस घरीच बसून आहेत. मात्र परप्रांतीय विक्रेत्यांमध्ये कुठलेच गांभीर्य दिसून येत नाही. पालिका किंवा पोलिसांचेही त्यांच्यावर कुठलेच नियंत्रण नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया लोकांनी बोलून दाखविल्या.

Related Stories

कोडली येथील इसमाचा मृतदेह सापडला

Patil_p

करमल घाटात अपघातः वाहतूक खोळंबली

Amit Kulkarni

कोरोना फैलाव वाढताच

Amit Kulkarni

कोलवाळ तुरुंगात निकृष्ट जेवण आदी समस्या सोडवाव्यात

Patil_p

दुकाने सकाळपासून सायंकाळपर्यंत खुली

Patil_p

आय-लीग फुटबॉल स्पर्धेत चेन्नई सिटी, आयजॉल एफसीचे विजय

Amit Kulkarni
error: Content is protected !!