तरुण भारत

मुरगावच्या माजी उपनगराध्यक्षांसह कुटुंबातील चौघांचा मृत्यू,

तिघा कोविड बाधितांचा समावेश, महिनाभरातील घटना

प्रतिनिधी / वास्को

Advertisements

कोरोनाचे गांभिर्य दिवसेदिवस भयावह पातळीवर वाढत आहे. घराघरांमध्ये कोरोनाचे रूग्ण कॉरन्टाईन राहात असून गेल्या महिनाभरात अनेक कुटुंबांना आपल्या जवळच्या माणसांना गमवावे लागले आहे. वास्कोत माजी उपनगराध्यक्ष व त्यांच्या कुटुंबातील दोघांना कोरोनामुळे मृत्यू आलेला असून या मृत्यूमुळे चिंता पसरली आहे. याच कुटुंबातील एका महिलेचाही मृत्यू झाला आहे. मात्र, तिचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचे सिद्ध झालेले नाही. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये वडिल, मुलगा व मेहुण्याचा समावेश आहे.

कोरोनाने सध्या गोव्याला घेरलेले आहे. घराघरांमध्ये कोरोनाचे रूग्ण आणि कोरोनाचे संशयित रूग्णही कॉरन्टाईन आहेत. सत्य परिस्थिती लपवण्याचेही प्रयत्न काहींकडून होत असल्याच्या तक्रारी आहेत. काही लोक सुरुवातीला वैद्यकीय सल्ला व उपचार टाळण्याचे प्रयत्न करतात. मात्र, त्रास असहय़ होऊ लागताच कोरोना चाचणी व डॉक्टरांना भेटण्यासाठी धाव घेतात असे दिसून येत आहे. त्यामुळे ही सार्वजनिक समस्या अधिकच गंभीर बनत चाललेली आहे. गेल्या महिन्याभरात वास्को परिसरात कोरोनामुळे अनेकांचा बळी गेला आहे. यात धडधाकड युवकांचाही समावेश आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा व त्यात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची धक्कादायक घटना वास्को बायणा भागात महिनाभरात घडली. या प्रकाराने सध्या चिंता पसरलेली आहे. मुरगावचे माजी उपनगराध्यक्ष व बायणातील रहिवासी जोकी कुलासो यांच्या कुटुंबात ही घटना घडली आहे. उपलब्ध माहितीनुसार, जोकी कुलासो यांच्या पत्नीचे 3 एप्रिलला निधन झाले होते. मात्र, 10 एप्रिलला त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. तिच्या मृत्यूचा कोरोनाशी संबंध नसल्याचे बोलले जाते. परंतु त्यानंतर कुलासो यांच्याच घरात राहणारे त्यांचे मेहुणे जॉर्ज रॉड्रिक्स यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या पाठोपाठ मुरगाव पालिकेत नगरसेवक म्हणून दोन वेळा निवडून आलेल्या 75 वर्षीय जोकी कुलासो यांनाही कोरोनामुळे मृत्यू आला. त्यानंतर तीन दिवसांपूर्वीच जॉकी कुलासो यांच्या प्रँको कुलासो या 41 वर्षीय वर्षीय पुत्रालाही कोरोना संसगातूनच मृत्यू आला. प्रँको याला वडिलांच्या मृत्यूच्या दिवशीच कोविडमुळे गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोनाचे गांभीर्य दर्शवणाऱया या घटनेमुळे लोकांमध्ये भीती पसरलेली आहे.

बहुसंख्य लोकांमध्ये भीती पसरलेली असली तरी आजही बरेच लोक बेपर्वाईने वागताना दिसतात. आजही या गंभीर समस्येचे सोयरसुतक नसलेले लोक बिनधास्तपणे वागताना दिसतात. अशाच वृत्तीमुळे वास्को परिसरात रोज जवळपास दीडशे व्यक्ती कोविड बाधित आढळून येत आहेत. रविवारी संध्याकाळी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, वास्को शहर व परीसरात 711 कोरोना बाधितांची नोंद झाली होती. कुठ्ठाळी आरोग्य केंद्रात 1346 तर कासांवली आरोग्य केंद्रात 913 रूग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे मुरगाव तालुक्यात सध्या 2970 कोरोना बाधित असून हजारो रूग्ण घरीच कॉरन्टाईन आहेत. वास्को शहरात रविवारी सकाळी व संध्याकाळी लॉकडाऊन असूनही लोकांची व वाहतुकीची वर्दळ वाढली होती.

Related Stories

‘हरमलचा राजा’ला निरोप

Omkar B

म्हादईसंबंधी अहवालास एका आठवडय़ाची मुदत

Amit Kulkarni

डेन्मार्कच्या ‘इन्टू द डार्कनेस’ चित्रपटाला सुवर्णमयूर

Amit Kulkarni

राज्यातील काजू उत्पादनाचा दर प्रति किलो 11 रुपयाना घसरला

Amit Kulkarni

हरमलात वादळी पावसामुळे पडझड, लाखोंचे नुकसान

Omkar B

वाळपई-ठाणे येथे अपघातात हिवरे येथील युवकाचा मृत्यू

Amit Kulkarni
error: Content is protected !!