तरुण भारत

बेळगाव वन कार्यालयांतील कामे ठप्प

कार्यालये तुर्तास बंद : नागरिकांची गैरसोय

बेळगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बेळगाव येथील वन कार्यालये बंद झाल्याने कार्यालयातील कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे शासकीय कागदपत्रे मिळविणाऱया व विविध कर भरणा करणाऱया सर्वसामान्यांची गैरसोय होताना दिसत आहे. बेळगाव वनच्या कार्यालयांतून आधारकार्ड, रेशनकार्डसह लाईट बिल, पाणी बिल, घरपट्टी भरून घेण्यासह इतर शासकीय कागदपत्रे पुरविली जातात. त्यामुळे नागरिकांची सतत वर्दळ असते. मात्र कार्यालय बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या कार्यालयात मनपा हद्दीतील घरपट्टी भरून घेतली जाते. शिवाय मागील महिन्यात घरपट्टी भरणाऱया नागरिकांना 5 टक्के सवलत देण्यात आली होती. त्यामुळे सवलतीचा फायदा घेण्यासाठी घरपट्टी भरणाऱयाची संख्या वाढली होती. शहरातील अशोकनगर, गोवावेस, रिसालदार गल्ली, टीव्ही सेंटर, बिगबाझार आदी ठिकाणी असलेल्या कार्यालयात घरपट्टी भरून घेतली जात होती. मात्र क्लोजडाऊनच्या घोषणेमुळे मागील दोन दिवसांपासून बेळगाव वन कार्यालये बंद झाल्याने सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे. कर भरणा करण्यासाठी चलन मनपाच्या कार्यालयातून देण्यात येत असून ऑनलाईनद्वारे बिल भरणा करण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. या कार्यालयात घरपट्टी भरून घेतली जाते. शिवाय विविध कंपन्यांचे मोबाईल बिल देखील भरून घेतले जाते. इतर शासकीय कागदपत्राची पुर्तता देखील केली जाते. त्यामुळे नागरिकांची सतत ये-जा असते. मात्र सध्या तुर्तास हे कार्यालय बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

Advertisements

Related Stories

कंग्राळी बुद्रुकमध्ये मोटारसायकलची चोरी

Patil_p

शिरगुप्पी-ऐनापूर मार्गे बसेस सुरू

Patil_p

महामोर्चा-सायकल फेरीत मोठय़ा संख्येने सहभागी व्हा

Patil_p

कार्यकर्त्यांवरील राजदोहाचा गुन्हा मागे घ्या

Amit Kulkarni

अधिवेशन काळात धरणे, रॅलींना परवानगी नाही

Amit Kulkarni

मतमोजणीसाठी 12 खोल्यांची व्यवस्था

Amit Kulkarni
error: Content is protected !!