तरुण भारत

स्थलांतरित भाजीमार्केटमध्ये खरेदी-विक्रीला प्रारंभ

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गतवषीप्रमाणे यंदाही भाजीमार्केट तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्यात आले आहे. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी शहरातील ऑटोनगर, इंडॉल व सीपीएड मैदानांवर तात्पुरती भाजीमार्केट सुरू करण्यात आली आहेत. रविवारी या भाजी मार्केटमधून खरेदी-विक्रीस प्रारंभ झाला. यापैकी रविवारी सीपीएड मैदान व ऑटोनगर येथील भाजीमार्केटमध्ये खरेदी-विक्रीला सुरुवात झाली असून सोमवारी इंडॉल येथील भाजीमार्केटला प्रारंभ होणार आहे. तात्पुरत्या स्वरुपात सुरू करण्यात आलेल्या भाजीमार्केटमध्ये खरेदी-विक्रीसाठी वर्दळ वाढली होती.

Advertisements

जनतेच्या सोयीसाठी शहराच्या उत्तर भागात दोन व मध्यवर्ती भागात एक अशी तीन ठिकाणी तात्पुरती भाजीमार्केट सुरू करण्यात आली. दरम्यान, भाजी विक्रीसाठी स्थलांतरित भाजीमार्केटमध्ये गाळे उभारण्यात आले आहेत. या गाळय़ांतून भाजीची खरेदी-विक्री होत आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेला सुरुवात झाली असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तीन ठिकाणी तात्पुरत्या भाजी मार्केटची निर्मिती करण्यात आली आहे. शिवाय एपीएमसी भाजीमार्केटमधील गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी स्थलांतरित भाजी मार्केट सुरू करण्याला परवानगी दिली आहे.

रविवारी सुरू करण्यात आलेल्या स्थलांतरित भाजीमार्केटमध्ये शेतकरी भाजी घेऊन आले होते. शिवाय व्यापारीही भाजी खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे स्थलांतरित भाजी मार्केटमध्ये खरेदी-विक्रीसाठी वर्दळ वाढलेली होती. मात्र कोरोना नियमाचा फज्जा उडत आहे.

दक्षिण भागातील नागरिकांची गैरसोय

तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्यात आलेले भाजीमार्केट उत्तर भागात झाल्याने दक्षिण भागातील शेतकरी उत्पादकांची व व्यापाऱयांची गैरसोय होत आहे. दरम्यान, क्लोजडाऊनमध्ये निर्बंध कडक करण्यात आल्याने नागरिकांना भाजीमार्केटला जाताना अडचणी निर्माण होत आहेत.

Related Stories

एपीएमसी बाजारात कांदा दरात वाढ

Amit Kulkarni

फुटपाथवर फेरीवाले अन् सायकल ट्रकमध्ये दुचाकी वाहने

Amit Kulkarni

गांधी चौकातील रस्ता कधी खुला होणार?

Amit Kulkarni

कर्नाटकात २४ तासात कोरोनाचा नवा विक्रम

Abhijeet Shinde

ओल्डमॅनच्या प्रतिकृती साकारण्यात बालचमू मग्न

Patil_p

आत्मसंरक्षणासाठी कराटेचे महत्त्व अधोरेखित करणारा धाडस

Patil_p
error: Content is protected !!