तरुण भारत

शहर परिसराला वाऱयासह वळिवाचा दणका

काही ठिकाणी पडझड, ग्रामीण भागाला झोडपले

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

मागील काही दिवसांपासून सातत्याने शहर व ग्रामीण भागात वळिवाचा दणका बसत आहे. रविवारीदेखील शहर व ग्रामीण भागात वळिवाच्या पावसाने झोडपले. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. दुपारनंतर जोरदार वाऱयासह पावसाला सुरुवात झाली. जोरदार पाऊस कोसळल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. जोरदार वाऱयामुळे काही ठिकाणी पडझड झाली तर सखल भागात पाणी साचले होते.

विजांच्या कडकडाटासह रविवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरीस प्रारंभ केला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शिवाय उकाडय़ाने त्रस्त झालेल्या जनतेला मात्र दिलासा मिळत आहे. विशेषकरून रविवारी लग्नाचा मुहूर्त होता. त्यामुळे अनेक ठिकाणी लग्न सोहळय़ांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे वऱहाडी मंडळींची तारांबळ उडाली. मागील काही दिवसांपासून तालुक्मयात सातत्याने वादळी पाऊस होत असल्याने शेतकऱयांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. काही भागात शेतकऱयांनी ज्वारी काढून ठेवली आहे. त्यामुळे ज्वारी कुजून नुकसान होण्याचे भीती व्यक्त होत आहे. शिवाय भाजीपाला काढणीतही अडचणी निर्माण होत आहेत. मशागतीच्या कामासाठी हा पाऊस समाधानकारक ठरत असला तरी अद्याप काही ठिकाणी ज्वारी, भाजीपाला व इतर पिके असल्याने त्यांना हा पाऊस मारक ठरत आहे.

 शहरासह ग्रामीण भागात दमदार पाऊस झाला. रविवारी सकाळपासून उष्म्यात वाढ झाली होती. मात्र, दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. शनिवारी रात्रीही शहरासह तालुक्मयातील काही भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी पडझड होऊन ग्रामीण भागातील वीज रात्रभर गायब झाली होती. अधून-मधून वादळी वाऱयासह पाऊस होत असल्याने पडझड होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. झाडांची व विद्युत खांबांची पडझड होत असल्याने वीज गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांना रात्रभर अंधारातच राहावे लागत आहे. वाढत्या उष्म्यामुळे एकीकडे जनता हैराण झाली आहे, तर दुसरीकडे वादळी पावसामुळे रात्री-अपरात्री वीज गायब होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.   शहरासह तालुक्यातील कडोली, अगसगे, चलवेनहट्टी, हंदिगनूर, म्हाळेनट्टी, मण्णीकेरी, केदनूर, अतिवाड, बेकिनकेरे, अलतगा, आंबेवाडी, बसुर्ते, उचगाव, तुरमुरी, सुळगा, कल्लेहोळ, मण्णूर आदी भागात दमदार पाऊस झाला.

Related Stories

आरोग्यवंत समाजनिर्मितीत केएलईचे मोठे योगदान

Amit Kulkarni

शनिवारी 232 जणांचा अहवाल निगेटिव्ह

Patil_p

अंनिस बेळगाव शाखेच्या कार्यशाळेला प्रतिसाद

Patil_p

बिम्समध्ये 1 लाख कोरोना तपासणी पूर्ण

Patil_p

बडेकोळमठाचा रस्ता तातडीने करा

Omkar B

ट्रक्टर उलटल्याने 15 जण जखमी

Patil_p
error: Content is protected !!