तरुण भारत

देशात कोरोनाचा विळखा होतोय घट्ट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा मागील 12 दिवसांपासून तीन लाखांहून अधिक आहे. रविवारी पुन्हा 3 लाख 68 हजार 147 बाधितांची नोंद झाली. तर 3417 रुग्ण दगावले. मृतांचा दैनंदिन आकडाही मागील आठवड्यापासून तीन हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे देशात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे दिसून येते.

Advertisements

देशात आतापर्यंत 1 कोटी 99 लाख 25 हजार 604 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 1 कोटी 62 लाख 93 हजार 003 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. अजूनही 34 लाख 13 हजार 642 रुग्ण उपचार घेत असून, 2 लाख 18 हजार 959 रुग्ण दगावले आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 15 कोटी 71 लाख 98 हजार 207 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. 

देशात आतापर्यंत 29 कोटी 16 लाख 47 हजार 037 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 15 लाख 04 हजार 698 कोरोना चाचण्या रविवारी (दि.02) करण्यात आल्या. 

Related Stories

एअर इंडियाच्या लिलावाला 30 जूनपर्यंत मुदतवाढ

datta jadhav

विजयन, हासन यांनी भरला उमेदवारी अर्ज

Patil_p

विजयन सरकारकडून शिष्टाचाराचा भंग

Patil_p

कोलकात्यात नव्या प्रकारचा मास्क

Patil_p

परमबीर सिंग यांच्याकडून अनिल देशमुखांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी

triratna

12 मार्चला क्वाडची पहिली परिषद

Patil_p
error: Content is protected !!