तरुण भारत

स्टेट बँकेचे गृहकर्ज झाले स्वस्त

वृत्तसंस्था/ मुंबई

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना दिलासा देताना गृहकर्ज व्याजदरात पुन्हा कपात केली आहे. यामुळे गृहकर्जधारकांच्या हप्त्याचा भार काहीअंशी कमी होण्यास मदत होणार आहे.

Advertisements

स्टेट बँकेने 30 लाखापर्यंतच्या गृहकर्जाचा व्याजदर आता 6.70 टक्के इतका केला आहे. जो आधी 6.90 टक्के इतका होता. 30 लाख ते 75 लाख पर्यंतच्या गृहकर्जासाठी 6.90 टक्के व्याजदर आकारला जाणार असून 75 लाखापुढच्या गृहकर्जावर 7.05 टक्के इतका व्याजदर आकाला जाणार आहे. दुसरीकडे महिलांनी गृहकर्ज घेतल्यास त्यांना व्याजदरात 0.05 टक्के सवलत दिली जाणार असल्याचे बँकेने सांगितले.

इएमआय होणार कमी

15 वर्षासाठी 30 लाखाचे गृहकर्ज घेतल्यास एखाद्याला 6.95 टक्के दराने दर महिन्याला 26 हजार 881 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. तर नव्या सवलतीनंतरच्या व्याजदरानुसार समान मासिक हप्ता 25 हजार 464 रुपये इतका भरावा लागणार आहे. तर दुसरीकडे महिलेने गृहकर्ज आपल्या नावावर घेतल्यास तिला 6.65 टक्के दरानुसार 30 लाखाच्या कर्जासाठी 15 वर्षासाठी 26 हजार 381 रुपये इतका हप्ता भरावा लागणार आहे.

Related Stories

टाटा स्टील भारतीय पोलाद संघातून बाहेर

Patil_p

‘लावा’ भारतात करणार 800 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

जीएसटी परिषद 27 ऑगस्ट रोजी होण्याचे संकेत

Patil_p

लॉकडाऊनमध्ये टेडिंग कसे करायचे?

Patil_p

छोटय़ा व्यापाऱयांचे 15.5 लाख कोटींचे नुकसान

Patil_p

आता सॉव्हरीन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणुकीची संधी

Amit Kulkarni
error: Content is protected !!