तरुण भारत

रिलायन्स-अरामकोमध्ये व्यवहाराची बोलणी

20 टक्के हिस्सेदारी विकणारः लवकरच करार पूर्ण

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रिज ही कंपनी तेल रिफायनिंग आणि पेट्रो रसायन उद्योगातील 20 टक्के वाटा विक्रीसाठी सऊदीमधील कंपनी अरामकोबरोबर रोख व शेअर्स स्वरूपात करार करण्याविषयी चर्चा करत असल्याचे समजते. याला लवकरच अंतिम स्वरुप मिळणार असल्याचे समजते.

अंबानी यांनी ऑगस्ट 2019 मध्ये तेल व रसायन व्यवसायमधील 20 टक्के हिस्सेदारी जगातील सर्वात मोठी तेल निर्यात कंपनीला विकण्याची घोषणा केली होती. या व्यवहारात गुजरातच्या जामनगरमधील 2 तेल रिफायनरी आणि पेट्रोरसायन मालमत्तेचा समावेश आहे. सदरचा व्यवहार हा मार्च 2020 मध्ये पूर्ण होणार होता. पण त्याला आता उशीर होत असला तरी त्याचे कारण मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. अलीकडच्या आठवडय़ात दोन्ही कंपन्यांमध्ये या व्यवहाराबाबत चर्चा सुरू झाली असल्याचे वृत्त आहे. या चर्चेअंतर्गत व्यवहारांची दिशा नक्की होणार असल्याचे सांगितले जात आहे.

शेअर्स आणि रोख रक्कमेच्या स्वरूपात हा व्यवहार होणार आहे. अरामको व्यवहारात सुरूवातीला शेअर्स आणि नंतर अनेक वर्षे रोख रक्कम भरणा करण्याबाबत विचार करते आहे. अटी नियमांनुसारच सदरच्या व्यवहाराला अंतिम स्वरूप देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Stories

डिजिटल अर्थव्यवस्था उद्योग क्षेत्राला कलाटणी देणारी

Patil_p

एफडीआय गुंतवणूकीत भारत चौथ्या स्थानी

Patil_p

5 जी नेटवर्क प्रवासात ऍपलचा होणार समावेश

Patil_p

कमोडीटी बाजारात सोने 1500 रुपयांनी वधारले

prashant_c

दूरसंचार कंपन्या मार्चपर्यंत एजीआरचे पेमेंट करण्याचे संकेत

Patil_p

शेअर बाजार विक्रमी स्तरावर, सेन्सेक्स 48 हजारावर

Patil_p
error: Content is protected !!