तरुण भारत

बायोकॉनचा नफा 105 टक्के अधिक

बेंगळूर

 औषध क्षेत्रातील कंपनी बायोकॉनच्या चौथ्या तिमाहीचा निकाल नुकताच प्रसिद्ध झाला असून तो कंपनीला खूपच दिलासा देणारा ठरला आहे. मार्चला संपलेल्या तिमाहीत बायोकॉनला 254 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.

Advertisements

 सदरचा नफा 105 टक्के इतका वाढला आहे. मागच्या आर्थिक वर्षात समान कालावधीत कंपनीने 123 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. एकत्रित महसूल 26 टक्के इतका वाढला असल्याचे दिसून आले आहे. 2020-21 आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीत एकत्रित महसूल 2 हजार 44 कोटी रुपयांचा नोंदला गेला आहे. जो मागच्या वर्षी समान कालावधीत 1 हजार 621 कोटी रुपये होता. बायोकॉन लिमिटेड ही देशातील आघाडीवरची बायोफार्मास्युटीकल कंपनी आहे. या बातमीनंतर शेअर बाजारात कंपनीचा समभाग 394 भावावर उच्चतम स्तरावर पोहचला होता.

Related Stories

स्मार्ट टीव्हींच्या बाजारपेठेत रंगणार स्पर्धा

Patil_p

2027 पर्यंत वार्षिक 63 लाख ई-वाहनांची होणार विक्री

Patil_p

अर्थव्यवस्था वेगाने येतेय पूर्वपदावरः शक्तीकांत दास

Patil_p

फसलेल्या पाककृती

Patil_p

बाजाराची पाचव्या दिवशीही तेजीची घोडदौड

Patil_p

एप्रिलमध्ये युपीआय पेमेंटचे प्रमाण घटले

Patil_p
error: Content is protected !!