तरुण भारत

पहिल्या दिवशी सेन्सेक्समध्ये किंचीत घसरण

निफ्टी अंशतः तेजीत – टायटन, इंडसइंड बँक नुकसानीत

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

5 राज्यांतील निवडणूकीचा निकाल आणि कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात चढउतार दिसून आला. सरतेशेवटी बीएसई सेन्सेक्सचा निर्देशांक 63 अंकांच्या घसरणीसह तर निफ्टी निर्देशांक 3 अंकांच्या वाढीसह बंद झाला.

सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स व निफ्टी काहीसे नकारात्मक कल दाखवत होते. चढ-उताराच्या सत्रानंतर सेन्सेक्स निर्देशांक 63.84 अंकांनी घटून 48,718.52 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 3 अंकांनी वधारत 14,634.15 अंकांवर बंद झाला. अदानी पोर्टस आणि एचयुएल यांचे समभाग तेजीसह बंद झाले. धातु निर्देशांक 2 टक्के तेजीसह बंद झाला तर एफएमसीजी निर्देशांक 1 टक्के वाढीसह बंद झाला. सेन्सेक्समध्ये टायटनचे समभाग सर्वाधिक 4.58 टक्के इतके घसरले होते. इंडसइंड बँकेचे समभाग 2 टक्के घसरल्याचे पहायला मिळाले.

5 राज्यातील निवडणुकांचा परिणाम व कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शेअर बाजाराची सुरुवात आज घसरणीने झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सचा निर्देशांक 426 अंकांच्या घसरणीसह सकाळी 48356.01 अंकावर खुला झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही घसरणीसह खुला झाला होता.

सुरुवातीच्या सत्रामध्ये सेन्सेक्समधील इंडसइंड बँक, बजाज ऑटो, डॉ. रेड्डी, नेस्ले मारुती, महिंद्रा अँड महिंदा आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग तेजीत होते. तिफ्टीत जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, सिप्ला व ब्रिटानिया यांचे समभाग तेजी दर्शवत होते. टायटन, बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक व रिलायन्स नुकसानीत होते. शुक्रवारी सेन्सेक्सचा निर्देशांक 983 अंकांनी  तर निफ्टी निर्देशांक 263 अंकांनी घसरुन बंद झाला होता. सेन्सेक्सचा निर्देशांक 48,782.36 वर तर निफ्टीचा निर्देशांक 14,631.10 अंकांवर शुक्रवारी बंद झाला होता. बँकिंग व रियल्टी क्षेत्रातील समभागांच्या विक्रीमुळे बाजारावर दबाव वाढल्याचे दिसून आले. धातू, एफएमसीजी व ऑटो क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग बाजाराला आधार देत होते. निफ्टी ऑटो निर्देशांकात एक्साइड इंडस्ट्रिज, मारुती, मदरसन सुमी, बजाज ऑटो व बाळकृष्ण इंडस्ट्रिज यांनी बाजाराला चांगला आधार दिला. बँकिंग क्षेत्रातील समभाग नुकसानीत दिसत होते. कोरोनाच्या दुसऱया लाटेने गुंतवणूकदारांचा संभ्रम वाढवला तर दुसरीकडे कंपन्यांचे तिमाही निकाल घोषित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात सकारात्मक कल दिसत होता. अन्य आशियाई बाजारात हाँगकाँग आणि सेऊलचे शेअर बाजार घसरणीसोबत बंद झाले आणि शांघाई व टोकीयोचे बाजार मात्र आज बंद होते.

Related Stories

व्होडाफोन-आयडियाचीस्थिती नाजूक

Patil_p

स्मार्टफोन बाजार 50 टक्क्मयांनी घटला, शाओमी, विवो मात्र अव्वल

Omkar B

एफडीआय गुंतवणूकीत भारत चौथ्या स्थानी

Patil_p

चिनी मोबाईल कंपन्यांचे उत्पादन घसरले

Patil_p

सिंगापुरी डॉलर नोट रद्दचा निर्णय

Omkar B

स्मार्टफोन कंपनी रियलमीचा टीव्ही येणार

Patil_p
error: Content is protected !!