तरुण भारत

बंगालमध्ये मजुराची पत्नी झाली आमदार

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालच्या बांकुडा जिल्हय़ातील सालतोडा मतदारसंघात भाजप उमेदवार चंदना बाउरी निवडून आल्या आहेत. त्यांनी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार संतोष कुमार मंडल यांना 4 हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभूत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्या सभांमध्ये येथील उमेदवाराची अनेकदा चर्चा केली होती.

Advertisements

भाजपने चंदना यांना सालतोडा मतदारसंघाची उमेदवारी दिली तेव्हा त्यांना याची कल्पनाच नव्हती. शेजाऱयांकडून तिला याची माहिती कळाली होती. चंदना बाउरी यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या बँक खात्यात केवळ 6335 रुपये आहेत. तर पतीच्या खात्यात केवळ 1561 रुपये आहेत. 31985 रुपयांची मालमत्ता असल्याचेही त्यांनी नमूद पेले होते. चंदना तसेच त्यांचे पती कुठल्याही प्रकारच्या जमिनीचे मालक नाहीत, दैनंदिन मजुरी करून स्वतःचे घर चालवतात. घरात एक गाय आणि तीन बकऱया आहेत.

चंदना 12 वीपर्यंत शिकल्या आहेत. तर त्यांचा पती 8 वीपर्यंत शिकला आहे. दोघेही मनरेगाकार्ड धारक आहेत. चंदना आणि त्यांच्या पतीला मागील वर्षीच पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत घर निर्मितीसाठी 60 हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे. या रकमेच्या मदतीने दोघांनी दोन खोल्यांचे घर उभारले आहे.

पंतप्रधानांकडून कौतुक

चंदना बाउरी यांचा उल्लेख पंतप्रधान मोदींनीच अनेकदा केला आहे.  चंदनाचे पती श्रवण पूर्वी फॉरवर्ड ब्लॉकचे सदस्य होते. 2011 मध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार आल्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी छळ केल्याने भाजपमध्ये प्रवेश केल्याचे ते सांगतात.

Related Stories

सुभाषचंद्र बोस जयंतीला राष्ट्रीय सुटी घोषित करा

Omkar B

पुन्हा ‘उन्नाव’ हादरले

Amit Kulkarni

राज्यात कोरोनाचे आणखी 2 बळी

Patil_p

भाजपला लाभ, तरीही ‘आप’ वरचढ

Patil_p

हिमस्खलनात 5 हुतात्मा

Patil_p

उत्तराखंडात 49 नवे रुग्ण; ॲक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण 4 टक्क्यांनी कमी

pradnya p
error: Content is protected !!