तरुण भारत

विदेशी प्रसारमाध्यमांकडून ममतांचे कौतुक

कोरोना रोखण्यास मोदी ठरले अयशस्वी – मोठा पराभव

वृत्तसंस्था/ ढाका

Advertisements

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा विजय आणि त्यांच्या पराभवाला जगभरातील प्रसारमाध्यमांनी मोठे स्थान दिले आहे. पश्चिम बंगालला लागून असलेल्या बांगलोदशात वृत्तपत्रांनी ममतांच्या कामगिरीला पहिल्या पानावर मुख्य स्थान दिले आहे. तर जगातील अन्य वृत्तपत्रांनी पश्चिम बंगालमधील भाजपच्या पराभवासाठी कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यात मोदी सरकारच्या अपयशाला जबाबदार ठरविले आहे.

बांगलादेशातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्र डेली स्टारने ‘ममतांचा झुंजार विजय’ अशा आशयाचा मथळा दिला आहे. ममता बॅनर्जींना नंदीग्राममध्ये अटीतटीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला, पण तृणमूल काँग्रेसच्या या चमत्कारिक नेत्याने स्वतःच्या पक्षाला पश्चिम बंगालमध्ये तिसऱयांदा सत्तेवर आणले आहे. ममता बॅनर्जी यांनी स्वतःचे धैर्य आणि राजकीय बुद्धीतून एकटय़ाच्या बळावर मोदींच्या लाटेला परतविले असल्याचे डेली स्टारने नमूद पेले आहे.

बांगला भाषेतील वृत्तपत्रांनीही ममतांच्या विजयाला मुख्य स्थान दिले आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी बांगलादेशच्या दौऱयावर गेले होते आणि त्यांनी स्थानिक बंगाली मतुआ समुदायाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. भारतात कोरोना महामारीने उग्र रुप धारण केले असताना पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपवर मात केली असल्याचे अल जजीरा या वाहिनीने म्हटले आहे.

महामारीकडे दुर्लक्ष

मोदींच्या कोरोना महामारीवर लक्ष देण्याऐवजी निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्यावरून टीका होत असल्याचे अल जजीराने नमूद पेले आहे. कोरोनारुग्णांच्या उच्चांकी मृत्यूंदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालसारख्या प्रमुख राज्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने पश्चिम बंगालमध्ये पूर्ण शक्ती पणाला लावली होती. पण ममता बॅनर्जी यांनी भाजपचा दारुण पराभव केला आहे. कोरोना महामारीऐवजी निवडणुकीवर मोदींनी लक्ष केंद्रीत केल्याची टीका बीबीसीकडून करण्यात आली आहे.

Related Stories

केरळ सरकारचे विधेयक घटनाविरोधी

Patil_p

मतदानाच्या तिसऱया टप्प्याची सज्जता

Patil_p

आरोग्य सेतूचा वापर प्रभावीपणे करा : राज्यमंत्री संजय धोत्रे

pradnya p

ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री रागिणी द्विवेदीला अटक

Patil_p

पंजाबमध्ये मागील 24 तासात 562 नवे कोरोना रुग्ण; 21 मृत्यू

pradnya p

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी : गृहमंत्री

pradnya p
error: Content is protected !!