तरुण भारत

छोटय़ा तलवारीसह जन्माला येतो मासा

सोशल मीडियावर एका छोटय़ाशा माशाचे छायाचित्र व्हायरल होत आहे. ट्विटरवर एका वापरकर्त्याने याचे छायाचित्र शेअर करत ‘बेबी स्वोर्डफिश छोटय़ा तलवारीसह जन्माला येते’ अशी टिप्पणी केली आहे. धारदार तलवारीसारख्या चोचेमुळे या माशाला स्वोर्डफिश म्हटले जाते, हा मासा अत्यंत हिंसक असतो. पण हा छोटा मासा लोकांना खूपच आवडू लागला आहे.

या छायाचित्राला आतापर्यंत 2 लाख 24 हजारांहून अधिक लाइक्स आणि 23.4 हजारांहून अधिक री-ट्विट्स मिळाले आहेत. तसेच लोकांनी या छायाचित्रावर मजेशीर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

Advertisements

स्वॉर्डफिश जगभरातील समुद्रांमध्ये आढळून येतो. स्वतःची स्ट्रीमलाइंड बॉडी आणि टोकदार-धारदार चोचीमुळे हा मासा अत्यंत वेगाने पोहतो. हा मासा 80 किलोमीटर प्रतितासाच्या वेगानेही पोहू शकतो.

Related Stories

बलूच आंदोलन संपविण्यासाठी चीनकडून रसद

Patil_p

नव्या नकाशाला मान्यता देण्यासाठी नेपाळकडून घटनादुरुस्ती

datta jadhav

अबब.. 7 किलोमीटर लांबीचा वेडिंग वेल

Patil_p

सर्वात वास्तव्ययोग्य देश ‘सिंगापूर’

Patil_p

3 वर्षीय रशियन मुलावर चेन्नईत शस्त्रक्रिया

Patil_p

‘स्लोवेनिया’ : युरोपातील पहिला कोरोनामुक्त देश

datta jadhav
error: Content is protected !!