तरुण भारत

आता ‘दृष्टीहीन’ही पाहू शकणार

एआय तंत्रज्ञानयुक्त बायोनिक व्हिजन सिस्टीम

महामारीच्या काळात सुखद वृत्त समोर आले आहे. वैज्ञानिकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने बायोनिक व्हिजन सिस्टीम तयार केली आहे. याच्या मदतीने दृष्टीहीन लोकांना पाहण्यास मदत मिळणार आहे. हे तंत्रज्ञान फ्रान्सची बायोइलेक्ट्रॉनिक्स कंपनी ‘पिक्सियम व्हिजन’ने विकसित केले असून प्राइमा व्हिजन हे नाव दिले आहे.

Advertisements

मेडटेक फोरम-2021 मध्ये या तंत्रज्ञानाला वैद्यकीय जगतातील सर्वात आधुनिक आणि पुढील पिढीसाठी सर्वात नवोन्मेषी संशोधनाच्या स्वरुपात पुरस्कृत करण्यात आले आहे. फ्रान्सच्या दृष्टीबाधित 5 रुग्णांदरम्यान तीन वर्षांपर्यंत करण्यात आलेले परीक्ष्मण यशस्वी झाल्यावर याला लवकरच बाजारात आणले जाणार आहे.

हे क्रांतिकारक तंत्रज्ञान दृष्टी गमाविलेल्या लोकांसाठी एकप्रकारचे वरदानच आहे. या सिस्टीमच्या मदतीने दृष्टीहीन व्यक्तीही आता पूर्णपणे पाहू शकतील. याच्या निर्मितीत मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, इंटेलिजेंट सॉफ्टवेअर एल्गोरिदम, व्हिज्युअल प्रोसेसिंग आणि न्युरो बायोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. आम्ही मागील 10 वर्षांपासून या तंत्रज्ञानावर काम करत आहेत. आतापर्यंत अनेक रुग्णांवर याचे परीक्षण करण्यात आले आहे. 2019 मध्ये अमेरिकेच्या डेट्रॉयट आणि पॅरिसमध्ये करण्यात आलेल्या मानवी परीक्षणातही यश मिळाल्याचे उद्गार पिक्सियम व्हिजनचे सीईओ लॉयड डायमंड यांनी काढले आहेत.

कंपनी लवकरच या तंत्रज्ञानाच्या नव्या आवृत्तीसह बाजारात येणार आहे. अंतिम परीक्षणात दृष्टीबाधित रुग्ण एकाचवेळी आमच्याकडून विकसित करण्यात आलेले बायोनिक तंत्रज्ञान आणि सामान्य दृष्टी म्हणजेच दोन्ही प्रकारच्या क्षमतांचा वापर करू शकतो असे आढळून आले आहे. सध्या जगभरात 4 कोटी दृष्टीहीनांसह 28.5 कोटी लोक दृष्टीदोषाच्या आजाराने पीडित आहेत. तसेच 20 कोटी लोक वयोमानाशी संबंधित मॅक्युलर डिजेनेरेशन (एएमडी) आजाराने ग्रस्त असल्याचे डायमंड यांनी सांगितले आहे.

व्हिज्युअल पॅटर्न

प्राइमा व्हिजन एआययुक्त तंत्रज्ञान असून ते रेटिनाच्या मागे (दृष्टीपटल) एक गेटवे तयार करते. सिग्नलला रेटिनापासून ब्रेन व्हिजन सिस्टीममध्ये पाठविण्याचे काम ते करते. रेटिनामागे लावण्यात आलेल्या ऍक्टिवेटेड ब्रेनचिपद्वारे तयार होणाऱया व्हिज्युअल पॅटर्नच्या मदतीने पीडित संबंधित वस्तूला डोळय़ांसमोर पाहू शकतो.

Related Stories

अमेरिकेच्या संसदेत हिंसाचार : 4 ठार

Patil_p

कोरोना काळात नियमांचे अनुकरणीय पालन

Patil_p

8 वर्षांनी सुरक्षा परिषदेवर भारत

Patil_p

भुतानमधील सकतेंग अभयारण्यावर चीनचा दावा

datta jadhav

चीन 20 हजार कोरोनाग्रस्तांना मारणार ही अफवाच

prashant_c

आकडा 3 कोटीच्या पार

Patil_p
error: Content is protected !!