तरुण भारत

आयपीएलमध्येही कोरोनाची एन्ट्री

केकेआर संघातील वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियरला कोरोनाचा संसर्ग

कोलकाता नाईट रायडर्स-आरसीबी यांच्यातील सामना लांबणीवर

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

अवघ्या जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाने आयपीएलच्या बायो-बबलचे सुरक्षाकवचही भेदून काढले असून केकेआरचे 2 खेळाडू कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सोमवारचा केकेआर-आरसीबी यांच्यातील सामना लांबणीवर टाकला गेला आहे. पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे केकेआर-आरसीबी यांच्यात लढत होणे अपेक्षित होते. मात्र, त्यापूर्वीच वरुण चक्रवर्ती व संदीप वॉरियर हे केकेआरचे 2 खेळाडू कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला आणि आयोजकांनी सदर सामना लांबणीवर टाकावा लागत असल्याची घोषणा केली.

लांबणीवर टाकला गेलेला हा सामना नंतर घेतला जाईल, असे आयपीएल कार्यकारिणीने यावेळी नमूद केले. सध्याच्या रुपरेषेप्रमाणे ही स्पर्धा दि. 30 मे पर्यंत खेळवली जाणार आहे.

‘वरुण चक्रवर्ती व संदीप वॉरियर हे खेळाडू मागील 4 दिवसात घेतल्या गेलेल्या चाचणीत तिसऱया फेरीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. अन्य सर्व खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत’, असे आयपीएल कार्यकारिणीने प्रसिद्धी पत्रकातून नमूद केले.

बीसीसीआयने यापूर्वीप्रमाणे आताही शो मस्ट गो ऑनचा नारा देत स्पर्धा होणारच, या भूमिकेचा पुनरुच्चार केला. मात्र, एकूण 6 ठिकाणी 30 मे पर्यंत चालणाऱया या स्पर्धेदरम्यान समोर उभे ठाकणाऱया अडचणींवर कसा मार्ग काढायचा, हा त्यांच्यासमोरीलही कठीण प्रश्न असणार आहे.

दिल्लीतील ग्राऊंडसमनही कोरोनाबाधित

दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर तैनात काही ग्राऊंड्समन पॉझिटिव्ह असल्याचे सोमवारीच आढळून आले असून यामुळे आयोजकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. त्यामुळे याच मैदानावर मंगळवारी होणाऱया मुंबई इंडियन्स व सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील लढतीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान, दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी पॉझिटिव्ह आलेल्या ग्राऊंड्समनपैकी कोणीही स्टेडियमला डय़ुटीवर नसल्याचा खुलासा केला.

लेगस्पिनर वरुण चक्रवर्ती व मध्यमगती गोलंदाज संदीप वॉरियर यांना कोरोना झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयसोलेट केले गेले आहे. या उभयतांपैकी संदीप वॉरियरला केकेआरच्या मागील 7 सामन्यात एकदाही संधी दिली गेलेली नाही तर वरुण चक्रवर्तीने सर्व सामन्यात खेळत त्यात 7 बळी घेतले आहेत. चक्रवर्ती हा केकेआरच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. या उभयतांवर उपचार करणारे वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याचे केकेआर व्यवस्थापनाने यावेळी स्पष्ट केले.

केकेआरने यापूर्वी दि. 29 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अहमदाबाद येथे आपला शेवटचा सामना खेळला होता आणि त्यात खेळलेल्या दिल्लीच्या सर्व खेळाडूंची देखील चाचणी घेतली जाणार आहे. दिल्लीचे सर्व खेळाडू सध्या अहमदाबादमध्येच असून चक्रवर्ती व वॉरियर यांच्या थेट संपर्कात आलेल्या सर्व खेळाडूंची सर्वप्रथम चाचणी घेतली जाणार आहेत.

काय सांगते आयपीएलचे ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’?

कोव्हिड-19 मॅनेजमेंटकरिता आयपीएलच्या ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’प्रमाणे कोरोनाचा संसर्ग झालेल्या खेळाडूच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तीला 6 दिवस आयसोलेट व्हावे लागते आणि त्यानंतर पहिल्या, तिसऱया व सहाव्या दिवशीचे रिपोर्ट निगेटिव्ह असावे लागतात.

चेन्नईच्या 3 सदस्यांचा अहवाल प्रथम पॉझिटिव्ह, नंतर निगेटिव्ह!

चेन्नई सुपरकिंग्सचे सीईओ कासी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी व एक निम्नस्तरीय कर्मचारी असे तिघे जण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल रविवारी आला होता. पण, सोमवारी दुसऱयाच दिवशी पुन्हा निगेटिव्हचा अहवाल आला आणि गोंधळाचे वातावरण तयार झाले. नंतर बीसीसीआयने पॉझिटिव्ह आलेले पहिले अहवाल चुकीचे होते, असे स्पष्टीकरण दिले.

Related Stories

दुसऱया कसोटीसाठी बर्न्स पूर्ण तंदुरूस्त

Patil_p

मुंबई मॅरेथॉन : इथिओपियन धावपटूंचा वरचष्मा

Patil_p

पाकला धक्का : आशिया कपचे यजमानपद गेले

prashant_c

पहिल्या दिवसापासूनच चेंडू वळण्याची चिन्हे

Patil_p

फुटबॉल शौकिनांच्या संख्येवर निर्बंध

Patil_p

विंडीजकडून लंकेचा वनडे मालिकेत ‘व्हाईट वॉश’

Patil_p
error: Content is protected !!