तरुण भारत

सातारकरांनो, सावध व्हा, नियम पाळा

शहरात ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 1700- प्रत्यक्ष दवाखान्यात 158

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

सातारा जिल्हय़ाचे ठिकाण असलेल्या राजधानीत कोरोनाचा अक्षरशः कहर सुरु  आहे. एप्रिल महिन्यानंतर पुन्हा मे महिन्याच्या आरंभापासून  पुन्हा वाढू लागलेली कोरोना बाधितांची वाढती संख्या अंगावर काटा आणत आहे. शहरातील सर्व पेठा व उपनगरांमध्ये वाढणारी बाधितांची संख्या लॉकडाऊन असला तरी वाढतच आहे. आजमितीस फक्त एकटय़ा शहरात 1,700 च्या वर ऍक्टिव्ह रुग्ण संख्या झाली असून दररोज 50 च्या पटीत वाढणारी बाधितांची संख्या सातारकरांसाठी चिंतेचा व काळजीचा विषय ठरलीय. बाधित आलेल्यांच्या संपर्कातील, होम आयसोलेट असलेले नियम पाळत नसल्याने संसर्ग वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

कोरोना संसर्गाला एक वर्ष पूर्ण होताना सातारा तालुक्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 12 हजारांच्या वर गेली आहे. सातारा शहर व तालुका हे सप्टेंबर महिन्यापासून कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले आहेत. यामध्ये एकटय़ा सातारा शहरात आतापर्यंत 9 हजार 258 हजार रुग्ण बाधित झाले होते. त्यापैकी 7 हजार 409 रुग्णांनी कोरोनामुक्त होत या कोरोनाविरुध्दच्या लढाईत लढण्याचे बळ वाढवले आहे. जानेवारी, फेब्रुवारीत मंदावलेल्या बाधित वाढीने मार्च, एप्रिल आणि नंतर आता मे महिन्याच्या आरंभापासून पुन्हा घेतलेली उचल सातारकरांना सावधानेचा इशारा देत आहे.

पुन्हा एकदा कोरोनाचा जोर

सातारा जिल्हय़ात पश्चिम महाराष्ट्र कराड हॉटस्पॉट ठरले होते. मात्र, कराडलाही मागे टाकत आता सातारा शहर व तालुक्यात कोरोना बाधित वाढीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. यामध्ये सातारा शहरात दररोज 500 च्या पुढे बाधित वाढ होत आहे. रविवारी रात्रीच्या अहवालात एका दिवसात तब्बल 585 जणांचा अहवाल बाधित आल्याने आता परिस्थिती हाताबाहेर चाललीय. सातारा पालिका, आरोग्य विभागाकडून उपाय योजना करण्यात येत असल्या तरी लोकांनी स्वयंस्फुर्तीने काळजी घेतली पाहिजे.

शहरातील पॉझिटिव्हटी रेट 17.16 टक्के

सातारा शहरातील पॉझिटिव्हीटी रेट वाढला असून तो 17.16 टक्के एवढा झालाय. सातारा शहरातील शाहूपुरी, शाहूनगर, खेड, कृष्णानगर, संगमनगर, सदरबझारसह शहरातील सर्व पेठांमध्ये बाधितांची संख्या वाढतच आहे. सातारा शहरात 1 हजार 22 कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. सातारा शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये 870 बाधित आहेत. त्यापैकी 152 बाधितांवर प्रत्यक्ष दवाखान्यात उपचार सुरु असून उर्वरित होम आयसोलेट असल्याची माहिती अहवालात देण्यात आलीय.

शहरात एकूण बाधितांची संख्या 9,258

सातारा शहरातील एकूण बाधितांची संख्या चिंताजनक आहे. गेल्या वर्षभरात एकटय़ा सातारा शहरात 9 हजार 258 बाधित झाले असून त्यापैकी 7 हजार 409 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  सातारा शहराचा कोरोनामुक्तीचा रेट 80.03 एवढा चांगला असला तरी संसर्ग वाढ थांबवण्याचे आव्हान सातारा शहरातील नागरिकांसमोर आहे. सातारा शहरात आत्तापर्यंत 149 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.

बाधित व संपर्कातील सर्वांनी नियम पाळावेत

सातारा शहरातील बाधित वाढीचा वाढण्याचे कारण आरोग्य विभागाने बाधितांच्या अति संपर्कात आलेले नागरिक नियम पाळत नसल्याचे सांगितले आहे. तसेच काही होम आयसोलेट रुग्ण देखील बाहेर पडत आहेत. वास्तविक अति संपर्कातील लोकांनी 10 दिवसांनंतर टेस्ट करुन ती निगेटिव्ह आल्यास बाहेर पडावे तर होम आयसोलेट लोकांनी तर टेस्ट निगेटिव्ह आल्याशिवाय घराबाहेरच पडू नये. आम्हाला कोणतेही लक्षण नाही म्हणून मग लोक इतरांच्या संपर्कात जात असल्याने सातारा शहरातील संसर्ग वाढीचा वेग वाढत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. या सर्वांनी काटेकोरपणे नियम पाळण्याची आवश्यता आहे.

होम क्वारंटाईन रुग्णांनी नियम पाळावेत

सातारा शहरातील रुग्ण संख्या 1700 च्या घरात असली तरी त्यापैकी 1 हजार 542 तीव्र लक्षणे नसलेले किंवा लक्षणेच नसलेले रुग्ण होमक्वारंटाईन आहेत. 158 रुग्णांवर प्रत्यक्षात उपचार सुरु आहेत. यामध्ये काही जम्बो कोव्हिड हॉस्पिटलमध्ये, काही जिल्हा रुग्णालयात तर काहीजण खासगी कोव्हिड रुग्णालयात उपचार घेत आहेत. जे रुग्ण होम क्वारंटाईन आहेत त्यांनी त्यांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत घराबाहेर पडू नये व आरोग्य विभागाच्या संपर्कात राहून नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

मास्क, स्वच्छता, सुरक्षित अंतर

  सातारा शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेला आहे. पण सातारा शहरातील नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झाल्याने अनेकजण निष्काळजीपणा दाखवत आहेत. अशा विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करण्यात येत असून सामाजिक अंतर पाळण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार सुचना मिळत असल्या तरी सातारकर सुधारत नाहीत. अद्याप अजून काही काळ तरी मास्क, हातांची स्वच्छता व सुरक्षित अंतर ही त्रिसुत्री पाळावीच लागणार आहे.

Related Stories

‘महाराणी ताराराणी, येसूबाईंच्या समाधी जीर्णोद्धारासाठी सहकार्य करणार’

Abhijeet Shinde

खा. उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली विकासात गरुडझेप

datta jadhav

युवकाला ब्लॅकमेलिंग करत 4 लाख मागितले

Omkar B

अकरावी सीईटी परीक्षा हायकोर्टाकडून रद्द

datta jadhav

जिह्यात 3300 मेट्रिक टन युरिया दाखल

Abhijeet Shinde

इचलकरंजीत वर्षापासून अर्धवट राहिलेल्या रस्त्याचा केक कापून वाढदिवस

Abhijeet Shinde
error: Content is protected !!