तरुण भारत

जिह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले

प्रतिनिधी/ रत्नागिरी

 रत्नागिरी जिह्यात कोरोनापासून बरे होणाऱयांचे प्रमाण वाढत आह़े सोमवारी तब्बल 386 बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात आले.  रुग्ण बरे होण्याचे 69.37 पर्यंत पोहचले आह़े आतापर्यंत एकूण 16 हजार 391 कोरोना रुग्णांनी यशस्वीपणे या रोगावर मात केली आह़े सोमवारी जिल्हयात 324 कोरोना रुग्णांची भर पडली तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

  गेल्या काही दिवसांपासून जिह्यामध्ये कोरोना रूग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय असतानाच बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर भार कमी होत आह़े सोमवारी जिह्यामध्ये 324 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत़ केवळ 699 कोरोना चाचण्या करण्यात आल्याने बाधितांची संख्या कमी असल्याचे म्हटले जात आह़े सोमवारी आणखी 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े

 जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी आरटीपीसीआर चाचणीत 199 तर ऍन्टीजेन चाचणीत 125 असे एकूण 324  कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आल़ी  यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 186 दापोली 21, खेड 4, गुहागर 15, चिपळूण 19, संगमेश्वर 43, लांजा 20 व राजापूर 16 असे रूग्ण आढळून आल़े मंडणगड तालुक्यात एकही नवा रुग्ण आढळला नाही. जिह्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या आता 23 हजार 626 झाली आह़े

 जिह्यामध्ये सोमवारी नव्याने 17 मृत्यूंची नोंद करण्यात आल़ी यामध्ये  रत्नागिरी तालुक्यातील 5, संगमेश्वर 4,  चिपळूण 2 , राजापूर 1, खेड 1 तर लांजा येथील 4 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा  यामुळे जिह्यातील कोरोनामुळे मृतांची एकूण संख्या 698 झाली असून  मृत्यूदर 2.95 पर्यंत पोहोचला आह़े

Related Stories

रत्नागिरी : दापोलीत उद्या वीज बिल होळी आंदोलन

triratna

कोरोना मुक्त होताच पुन्हा रुग्णसेवेत

NIKHIL_N

तब्बल अकरा महिन्यानंतर शिवउद्यान गजबजले

NIKHIL_N

रत्नागिरी : दापोलीत राष्ट्रवादीच्या आंदोलनात पावसाचा व्यत्यय

triratna

रत्नागिरी : 25 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अडीच वर्षांची साधी कैद

triratna

जि. प. मार्फत 425 पीपीटी किटस्

NIKHIL_N
error: Content is protected !!