तरुण भारत

महात्मा फुले जनआरोग्य योजनेपासून कोरोना रुग्ण वंचित

प्रवीण जाधव / रत्नागिरी

कोरोनाबाधित रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करावेत, असे स्पष्ट आदेश शासनाकडून खासगी रुग्णालयांना देण्यात आले आहेत.. उपचारासाठी शासनाकडून केवळ 20 हजार रुपयांचे पॅकेज करण्यात आल्याने खासगी रुग्णालयांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आह़े परवडत नसल्याच्या कारणास्तव या योजनेखाली रुग्णांना ऍडमिट करण्यास खासगी रुग्णालयाकडून नकार दिला जात आह़े

Advertisements

रत्नागिरी जिह्यातील 7 खासगी रुग्णालयांना महात्मा फुले जनआरोग्य योजना राबवण्याची परवानगी देण्यात आली आह़े यामध्ये रत्नागिरी शहरातील परकार हॉस्पिटल, श्री रामनाथ हॉस्पिटल, लाईफ केअर हॉस्पिटल, वालावलकर हॉस्पिटल, एसएमएस हॉस्पिटल व अपरान्त हॉस्पिटल आदी खासगी रुग्णालयांचा समावेश आह़े राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ कोरोना रुग्णांना द्यावा, असे आदेश शासनाकडून देण्यात आले होत़े

  महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये पिवळ्या व केशरी रंगाच्या रेशनकार्ड धारकांना लाभ देण्यात येणार आह़े कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी शासनाकडून 20 हजार रुपयांचे पॅकेज करण्यात आले आह़े त्यापुढे होणारा खर्च रुग्णांनी स्वतः करावयाचा आह़े मात्र योजनेचा लाभ घेणाऱया रुग्णांकडून सर्व उपचार मोफत असल्याच्या गैरसमजातून उपचाराचा खर्च भरण्यास नकार दिला जात आह़े यामुळे रुग्णालय व रुग्णाचे नातेवाईक यांच्यात वादाची परिस्थिती निर्माण होत असल्याच्या घटना समोर आल्या होत्य़ा

 शासनाकडून करण्यात आलेल्या तुटपुंज्या पॅकेजमुळे खासगी रुग्णालयांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आह़े या योजनेचा लाभ कोरोना बाधितांना देणे परवडत नसल्याचे कारण खासगी रुग्णालय पुढे करत आहेत़ या योजनेखाली कोरोना बाधितांना उपचारासाठी दाखल करण्यास देखील नकार देत आहेत़ त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजना कोरोना बाधितांसाठी केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आह़े

 शासनाकडून कोरोना बाधितांना कोणत्या रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत याची माहिती अधिकृत वेबसाईटवर देण्यात येत आह़े रत्नागिरी जिह्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेखाली सुमारे 500 बेड शिल्लक असल्याचे या वेबसाईटवर दिसून येत आह़े महात्मा फुले योजनेतील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवावेत असे शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे. प्रत्यक्षात कोरोना रुग्ण या खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी गेल्यास त्याला महात्मा फुले जनआरोग्य योजनेखाली बेड नसल्याचे सांगण्यात येत आह़े याचा फटका कोरोना रुग्णाला बसत आहे. उपचारानंतर भली मोठी बिले रुग्णांच्या हातामध्ये पडत आहेत़ त्याचा नाहक भुर्दंड कोरोना रुग्णांना वा त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आह़े

Related Stories

लॉकडाऊनमध्ये कोकण रेल्वेकडून 51 श्रमिक रेल्वे

NIKHIL_N

सिंधुदुर्गात पाच हजार चाकरमानी दाखल

NIKHIL_N

रत्नागिरी : 6 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण

triratna

वाशिष्ठी नदीत बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू

Patil_p

रत्नागिरी : खारफुटीच्या न्यायवैद्यिक माहिती संकलनात महाराष्ट्र नंबर वन

triratna

गोव्यात नियमित जाणाऱयांना ओळखपत्रे द्या

NIKHIL_N
error: Content is protected !!