तरुण भारत

आंबा घाटात ट्रक दरीत कोसळून एक ठार

 वार्ताहर/ साखरपा

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाट येथे रविवारी रात्री 8 च्या सुमारास ट्रक दरीत कोसळला. पावस येथून चिरा घेऊन हा ट्रक मलकापूर येथे चालला होता.  रस्त्याचा अंदाज न आल्याने साईडपट्टी सोडून बाहेर गेलेला ट्रक सुमारे 200 फूट दरीत कोसळून झालेल्या या अपघातात सचिन पाटील (33, शाहुवाडी) हा जागीच गतप्राण झाला.

Advertisements

गायमुखाच्या सुमारे 1 किलोमीटर अलीकडे हा अपघात घडला. ट्रकमध्ये चालक, क्लिनर व हमाल असे प्रवास करत होते. यात क्लिनर सरदार भीमराव भोसले व हबाल अमोल कांबळे ( दोघेही रा. शाहुवाडी) हे दोघेही जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची खबर मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्रचे सर्व कर्मचारी, देवरूख पोलीस निरीक्षक मारुती जगताप घटनास्थळी पोहचले. रात्रीच्या अंधारात साखरपा पोलीस दूरक्षेत्राच्या कॉन्स्टेबल रोहित यादव आणि प्रशांत यादव यांनी खोल दरीत उतरून रेस्क्यू ऑपरेशन करून जखमींना वर काढले व अधिक उपचारासाठी आंबा येथील रुग्णालयात दाखल केले. सचिन पाटील यांचा मृतदेहही अंधारात दोरीच्या मदतीने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या मदत कार्यामध्ये अमलदार संजय मारळकर, प्रशांत नागवेकर, रोहित यादव, किरण देसाई, रीलेश कांबळे, विश्वास बरगळे आदी उपस्थित होते.

Related Stories

चिपळुणातून बालिकेचे अपहरण

Patil_p

रत्नागिरी : आंबा-काजूच्या बागा जळून खाक : कोट्यवधींचे नुकसान;

triratna

नाणारमध्ये प्रदूषणविरहीत प्रकल्प उभारून दाखवाच

Patil_p

कराडजवळ कारच्या भीषण अपघातात 4 ठार

NIKHIL_N

याकूब बाबा दर्ग्याचे रुपडे पालटणार

triratna

महाराष्ट्रातील पहिल्या प्लाझ्मा सेंटरचे रत्नागिरीत होणार 18ला उद्घाटन

Patil_p
error: Content is protected !!