तरुण भारत

कट्टर मराठीप्रेमी, माजी आमदार विनायक नाईक यांचे निधन

प्रतिनिधी / पणजी

कट्टर मराठीप्रेमी, थिवीचे मगोचे माजी आमदार, पिर्ण ग्रामपंचायतीचे सतरा वर्षे सरपंच तसेच गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य विनायक नाईक (80 वर्षे) यांचे काल सोमवारी गोमेकॉत कोरोनामुळे निधन झाले. अंत्यसंस्कार म्हापसा स्मशानभूमीत करण्यात आले.

Advertisements

 विनायक नाईक हे गेली कित्येक वर्षे गोव्याच्या मराठी साहित्य क्षेत्राशी तसेच शिक्षणक्षेत्राशी संबंधित होते. गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी अनेक वर्षे सांभाळली होती. सध्या ते मंडळाचे सदस्य होते. पेडणे येथे होणार असलेले व सध्या कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनातही ते मार्गदर्शन करत होते, असे मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी सांगितले.

 नाथ पै ट्रस्टचे संस्थापक सदस्य

 शिक्षण क्षेत्राशी त्यांचा खूप जवळचा संबंध होता. शिक्षण संस्था चालवणाऱया बॅ. नाथ पै मेमोरियल ट्रस्टचे ते संस्थापकांपैकी एक होते. तसेच ते विद्यमान सचिव होते. संस्थेतर्फे चालवणाऱया जाणाऱया कळंगुट येथील विद्यानिकेतन हायस्कूलचे ते माजी मुख्याध्यापक होते. कोलवाळच्या म. ज्योतिबा फुले हायस्कूलचे ते माजी मुख्याध्यापक होते.

 थिवीतील मगोचे आमदार

 1989 च्या विधानसभेत ते थिवीतून आमदार म्हणून निवडून आले होते.अखिल गोवा पंचायत परिषदेचे ते काही काळ अध्यक्ष होते. ते जाज्वल्य मराठीप्रेमी होते. मराठीसाठी झालेल्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

 समाजसेवा, शिक्षणात खूप मोठे योगदान : श्रीपादभाऊ

 केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी विनायक नाईक यांच्या निधनाबद्दल अतिव दुःख व्यक्त केले आहे. शिक्षण क्षेत्रातील आणि समाज सेवेतील त्यांचे योगदान खूप मोठे आहे. पुस्तकप्रेमी म्हणून ते प्रसिद्ध होते. मराठी भाषेसाठी त्यांचे कार्य सर्वश्रूत आहे. त्यांच्या पवित्र आत्म्याला चीरशांती लाभो, मंत्री नाईक यांनी ईश्वर चरणी प्रार्थना केली आहे.

 गोमंतक साहित्य सेवक मंडळाला दुःख

विनायक नाईक यांच्या जाण्याने सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्राची हानी झाली आहे, अशा शब्दात गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी त्यांना मंडळातर्फे श्रद्धांजली व्यक्त केली.

विनायक नाईक चांगले मित्र होते

खलप विनायक नाईक हे आपले चांगले कॉलेज मित्र होते त्यानंतर ते थिवीचे आमदारही झाले. थिवीच्या चौफेर विकास साधण्यासाठी ते सदैव झटले.

Related Stories

सहकार कायद्यात बदल व सुधारणांची गरज – नरेश सावळ

Patil_p

महावीर अभयाण्यात चार जलसंवर्धन प्रकल्प

Omkar B

सत्तरी उपजिल्हाधिकाऱयाकडून तीनजण दोषी

Patil_p

‘पणजी स्मार्ट सिटी’च्या कर्मचाऱयांनी लावले फटाके

Omkar B

पालिका निवडणूक पक्षीय पातळीवर नाहीच

Patil_p

बैलांच्या झुंजी त्वरित थांबवा

Amit Kulkarni
error: Content is protected !!