तरुण भारत

लॉकडाऊन फेल, निर्बंधानी काय होणार?

सरकारच्या वृत्तीबद्दल सर्वत्र असंतोष : सरकार गंभीर नसल्याचा होतोय आरोप कोरोनामुळे राज्याची परिस्थिती अति गंभीर

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लावलेले तीन दिवसांचे लॉकडाऊन निष्फळ ठरले असून गेल्या 24 तासात म्हणजे सोमवारी कोरोनामुळे 46 जणांचे बळी पडले आहेत तर नव्याने 2703 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. गोव्यात कोरोनाची आणीबाणी निर्माण झाली असून परिस्थिती अतिबिकट आणि अतिगंभीर बनली आहे. एकूण मृतांचा आकडा 1320 वर पोहोचला असून सक्रिय रुग्णांची संख्या 25839 झाली आहे. काल दिवसभरात 288 जणांना हॉस्पिटलात भरती करण्याची पाळी आली असून 3474 जणांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतच असून त्यात घट होण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत.

 कडक निर्बंध लागू केले म्हणून फुशारकी मारणाऱया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी परिस्थिती डोळय़ांनी बघितली तर कुठेच निर्बंध दिसणार नाहीत, असे एकंदरित चित्र आहे. त्या निर्बंधाचा कोणताही परिणाम कोरोना संसर्गावर होणार नसल्याची चर्चा जनतेमध्ये सुरू आहे. तीन दिवसांचे लॉकडाऊन तर फेल झाले असून आता 10 मे पर्यंतच्या कडक निर्बंधाने काय साध्य होणार? असा सवाल जनता करू लागली आहे. कडक निर्बंध केवळ नावापुरतेच आणि कागदावरच असल्याचे समोर येत आहे.

 सर्वत्र रोज वाढतायत कोरोना रुग्ण  

मडगाव आरोग्य केंद्रातील कोरोनाचे रुग्ण 2500 च्या जवळपास पोहोचले असून त्यांची संख्या 2454 इतकी झाली आहे. तेथे सर्वाधिक रुग्ण असून राजधानी पणजी आरोग्य केंद्रातील रुग्ण दीड हजार पार होऊन गेले आहेत. तेथील संख्या 1574 एवढी आहे. कांदोळी आरोग्य केंद्राने दीड हजार कोरोना रुग्णांचा टप्पा ओलांडला असून तेथील संख्या 1597 झाली आहे. डिचोली, म्हापसा, पर्वरी, कुठ्ठाळी, फोंडा येथील रुग्ण 1000 पार झाले आहेत. सर्वच आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असून राज्यातील बहुतेक सर्व पंचायत क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे.

राज्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 98088 एवढी झाली असून त्यातील 70929 जण कोरोनामुक्त झालेले आहेत.

कोरोना बळींची संख्या थरकाप उडविणारी

दिवसभरात झालेल्या 46 बळींपैकी 12 जणांचे प्राण हॉस्पिटलात दाखल केल्यानंतर 24 तासात गेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तासाला 1 किंवा 2 बळी अशी सरासरी होत असून हे प्रमाण गोव्यासारख्या छोटय़ा राज्यासाठी भयानक आणि संकटात टाकणारे आहे. गोमेकॉत 24 जणांचा मृत्यू झाला तर दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलात 14 जणांनी प्राण सोडला. सांगे प्राथमिक आरोग्य केंद्रात 3 जण मरण पावले. उत्तर गोवा जिल्हा हॉस्पिटलात 2 जणांचा अंत झाला तर खासगी हॉस्पिटल, ईएसआय हॉस्पिटल व धारबांदोडा आरोग्य केंद्रात प्रत्येकी 1 जण मृत झाला. मृतदेहाचे हे दैनंदिन प्रमाण भयानकता वाढवणारे आहे.

गोमेकॉच्या 130 इंटर्न डॉक्टर्सना सेवेत घेणार राज्यातील आरोग्य सेवा आणि सुविधांच्या अधिक वृद्धिसाठी राज्य सरकार गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) 130 शिकाऊ (इंटर्न) डॉक्टर्सना सेवेत घेण्याच्या विचारात असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. यामुळे राज्यात कोविडच्या उदेकातून उद्भवणाऱया परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमच्या मनुष्यबळ शक्तीत वाढ होईल. कोविड केअरसाठी सुरू केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राणे यांनी सुपर स्पेशलिटी ब्लॉकलाही भेट दिली. या भेटीदरम्यान बेड्स, वातानुकूलित व इतर उपकरणे याबाबतची व्यवस्था आपण तपासली आहे. अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन रूग्ण हाताळण्यासाठी आणि नर्ससाठी आवश्यक असलेल्या कर्मचाऱयांचा आढावा घेतला असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

मेरशी येथे आज सांगीतिक कार्यक्रम

Amit Kulkarni

संत निरंकारी मिशनतर्फे मडगावात 24 रोजी रक्तदान शिबिर

Amit Kulkarni

सत्तरीत काळी मीरी उत्पादनाला येणार चांगले दिवस

Patil_p

म्हापसा बाजारपेठ चाळीस टक्के खुली

Omkar B

अस्नोडा येथे लोकमान्यतर्फे शिक्षक सत्कार सोहळा

Amit Kulkarni

सांखळीत सूडाचे राजकारण थांबता थांबेना

Amit Kulkarni
error: Content is protected !!