तरुण भारत

बेशुद्ध झालेल्या महिलेला जेसीबीने हलविले रुग्णालयात

कोलार शहरातील घटना : मुलगी रडत होती तरीही कोरोनाच्या भीतीमुळे कुणीच आले नाही समोर

प्रतिनिधी / बेंगळूर

Advertisements

देशासह राज्यभरात कोरोना महामारीची दुसरी लाट अत्यंत भयावह असल्याने त्याची भीती लोकांच्या मनांमध्ये घर करून आहे. कर्नाटकातील कोलार शहरातील एक घटना याचा पुरावा आहे. येथे एक महिला रस्त्यावर बेशुद्ध होऊन कोसळली आणि ‘कोविडच्या भीतीने कुणीच तिला स्वतःच्या वाहनामधून रुग्णालयात नेण्यास तयार झाले नाहीत. नाईलाज झाल्याने महिलेला जेसीबी मशीनने रुग्णालयात नेण्यात दाखल करण्यात आले. पण जेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे. लोक आपल्या वाहनांचा वापर करण्यापासून घाबरत होते. एवढेच नाही तर कुणीच रुग्णवाहिकाही बोलाविली नाही. स्थानिक लोकांनी महिलेला जेसीबी मशीनच्या बकेटमध्ये ठेवून रुग्णालयात नेले आहे. 42 वर्षीय चंद्रकला ही महिला स्वतःच्या मुलीसोबत जात होती. ती हॉटेल तसेच अन्य छोटी-मोठी कामे करून स्वतःचा उदरनिर्वाह करत होती.

मुलीच्या मांडीवर डोकं ठेवलेली चंद्रकला बेशुद्ध

चंद्रकला स्वतःच्या 12 वर्षीय मुलीसोबत कुरुथहल्ली गावात पोहोचली होती. तेथे ती मजुरीचे काम करायची. चंद्रकला आजारी झाल्याने दोघी घरी परतत होत्या. पण रात्र झाल्याने त्या एका दुकानाबाहेर बसल्या होत्या. सकाळी ग्रामस्थांनी त्यांना खाद्यपदार्थ पुरविले. त्यानंतर मुलीच्या मांडीवर डोकं ठेवलेली चंद्रकला बेशुद्ध झाली होती. मुलीने तिला जागं करण्याचा प्रयत्न केला असता तिने कुठलाच प्रतिसाद दिला नव्हता.

कोरोनाची लागण नव्हती

स्वतःच्या आईला निपचित पडल्याचे पाहून मुलगी रडत राहिली. पण कुणीच सदर महिलेला रुग्णालयात नेण्यास तयार झाले नाहीत. कोरोना संसर्गामुळे चंद्रकलाची प्रकृती बिघडल्याची भीती लोकांना होती. पण काही वेळानंतर जेसीबी मशीनने रुग्णालयात दाखल झाल्यानंतर चंद्रकलाला कोविडची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले. चंद्रकलाने काही वर्षांपूर्वी स्वतःच्या पतीला गमावले होते. ती स्वतःची 12 वर्षीय मुलगी आणि 10 वर्षीय मुलासोबत राहत होती.

Related Stories

सेक्स सीडी प्रकरण : विधानसभेत काँग्रेस आमदारांचा गदारोळ

Shankar_P

कर्नाटक : पावसाळी अधिवेशनाच्या वेळापत्रकात बदल

triratna

चित्रपटगृहांवर निर्बंधाचा प्रस्ताव नाही : येडियुराप्पा

Amit Kulkarni

बेळगाव: रामदुर्ग शहरात एका जोडप्याची दोन मुलांसह आत्महत्या

Shankar_P

कर्नाटक : आज रात्रीपर्यंत ते प्रवासी सापडतील

triratna

स्फोटाचे दृष्य चित्रित करताना अभिनेता रिषभ शेट्टी जखमी

Amit Kulkarni
error: Content is protected !!