तरुण भारत

‘तुमच्याकडे चारच दिवस शिल्लक आहेत, जे करायचे ते करा’

  • योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

ऑनलाईन टीम / लखनऊ : 


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपत्कालीन सेवा असणाऱ्या 112 च्या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. अशाप्रकारे योगी यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही काही पहिलीच घटना नाही आहे. मात्र असे असले तरी पोलिसांनी या मेसेजची दखल घेतली असून या प्रकरणामध्ये सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये ज्या क्रमांकावरुन मेसेज आला आहे त्या व्यक्तीचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, 29 एप्रिल रोजी सायंकाळी उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपत्कालीन सेवा असणाऱ्या 112 या क्रमांकाच्या व्हॉट्सअप एका अज्ञात क्रमांकावरुन मेसेज पाठवून योगींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीमध्ये मुख्यमंत्री योगींकडे चार दिवसांचा वेळ शिल्लक असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पुढील चार दिवसात माझे जे काही करायचे आहे ते करा, पाचव्या दिवशी मुख्यमंत्री योगी यांना मी ठार मारणार आहे, असे या धमकीमध्ये म्हटले आहे.


थेट मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या या मेसेजमुळे पोलीस विभागामध्ये एकच गोंधळ उडालाय. धमकी ज्या क्रमांकावरुन आली आहे त्या क्रमांकाचा तपास करण्यासाठी एक सर्व्हिलन्स टीम स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये लखनऊमधील सुशांत गोल्फ सिटी येथील कंट्रोल रुममध्ये 112 चे ऑप्रेशन कमांडर अंजुल कुमार यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष टीम स्थापन करण्यात आली असून ही टीम या प्रकरणामधील तपासावर लक्ष ठेऊन आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी मदत करणार आहे.

Related Stories

लॉक डाऊन 2 : गृहमंत्रालयाकडून गाईडलाईन जारी

prashant_c

अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेपासून विभक्त

datta jadhav

हवाई दलाच्या परेडमध्ये पहिल्यांदाच सामील होणार राफेल

datta jadhav

माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार

pradnya p

जगभरात 61.72 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

लावापोरा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav
error: Content is protected !!