तरुण भारत

परिवहनसमोर कर्मचाऱयांच्या वेतनाचा प्रश्न

बससेवा ठप्प : परिवहनच्या तिजोरीत ठणठणाट

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

मागील महिन्यात पंधरा दिवस कर्मचाऱयांचा संप आणि आता 14 दिवस क्लोजडाऊनमुळे परिवहन मंडळाला मोठा फटका बसला आहे. गेल्या 25 दिवसांपासून सर्व प्रकारची बससेवा जागेवर थांबून असल्याने परिवहनला कोटय़वधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. दरम्यान, परिवहनचा महसूलही थांबल्याने तिजोरीत ठणठणाट निर्माण झाला आहे. त्यामुळे परिवहन कर्मचाऱयांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बेळगाव आगारात 3329 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱयांच्या वेतनासाठी परिवहनला दर महिन्याला 10 कोटींची गरज असते. मात्र, मागील महिन्याभरापासून बससेवा संप व क्लोजडाऊनमुळे ठप्प झाल्याने उत्पन्नाचा स्रोत थांबला आहे.

दरम्यान, संप व क्लोजडाऊनमुळे परिवहनचे आतापर्यंत 968 कोटींचे नुकसान झाले आहे. बेळगाव विभागाला दैनंदिन 60 लाखांचा महसूल मिळतो.

गतवषी दोन महिन्यांहून अधिक काळासाठी बससेवा ठप्प होती. दरम्यान, परिवहनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी परिवहनला राज्य सरकारने 761 कोटी रुपयांची मदत केली होती. यातून परिवहनने कर्मचाऱयांचे वेतन देऊ केले होते. वर्षभरापासून परिवहनच्या बससेवेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे परिवहनच्या महसुलावर परिणाम झाला आहे. यामुळे परिवहनसमोर कर्मचाऱयांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला
आहे.

संपकाळातील वेतन नाही संपात सहभागी होणाऱया कर्मचाऱयांना संप काळातील वेतन दिले जाणार नाही, असे परिवहनने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे परिवहन कर्मचाऱयांच्या मनात संभ्रम असून नेमके परिवहन किती दिवसांचे वेतन देणार, या चिंतेत कर्मचारी आहेत.

Related Stories

जिल्हय़ात 22 शिक्षकांना कोरोनाची लागण

Patil_p

वनाधिकारी एस. एस. निंगानी यांचा जागतिक वनदिनी सत्कार

Amit Kulkarni

लॉकडाऊन शिथिलनंतर चोऱया वाढल्या

Patil_p

लोकमान्य सोसायटीतर्फे 8 फेब्रुवारी रोजी ‘उन्नती 2020 एक पाऊल प्रगतीकडे’

Patil_p

गावातील समस्या गावातच सोडविली

Patil_p

हरणाची शिकार करणाऱया दोघांना जामीन

Patil_p
error: Content is protected !!