तरुण भारत

पॅसेंजर बंदमुळे प्रवाशांची गैरसोय

एक तरी पॅसेंजर सुरू ठेवण्याची प्रवाशांतून होतेय मागणी

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

प्रवाशांची संख्या कमी असल्याचे कारण दाखवत नैर्त्रुत्य रेल्वेने बेळगाववरून धावणाऱया दोन पॅसेंजर रद्द केल्या. पॅसेंजर रद्द केल्यामुळे हुबळीपासून शेडबाळपर्यंत प्रवास करणाऱयांचे पुन्हा एकदा हाल सुरू झाले आहेत. दररोज नोकरी-व्यवसायानिमित्त बेळगाव शहरात येणाऱयांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे निदान एक तरी पॅसेंजर सुरू ठेवण्याची मागणी रेल्वे प्रवाशांमधून केली जात आहे.

नैर्त्रुत्य रेल्वेने 10 एप्रिलपासून हुबळी-शेडबाळ व बेळगाव-शेडबाळ अशा दोन पॅसेंजर सुरू केल्या होत्या. पॅसेंजर सुरू झाल्या परंतु दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेल्याने प्रवाशांची संख्या कमी होत गेली. प्रवाशांअभावी रेल्वेला तोटा होत असल्याने नैर्त्रुत्य रेल्वेने एकूण 12 पॅसेंजर रद्द करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या 15 दिवसांमध्ये पॅसेंजर रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.

एकतरी पॅसेंजर सुरू व्हावी

दोन्ही पॅसेंजर अचानक रद्द केल्यामुळे शहरात येण्यासाठी प्रवाशांच्या नाकीनऊ येत आहेत. निदान बेळगाव-शेडबाळ ही पॅसेंजर सुरू करण्याची मागणी केली जात आहे. बेंगळूर-बेळगाव ही एक्स्प्रेस बेळगावमध्ये आल्यानंतर ती बेळगाव रेल्वेस्थानकात थांबून असते. त्यामुळे ही रेल्वे पॅसेंजर म्हणून शेडबाळपर्यंत सोडल्यास त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. सकाळी बेळगावमधून गोकाक, रायबाग, घटप्रभा, चिंचली, शेडबाळ या परिसरात जाणाऱयांना ही पॅसेंजर सोयीची ठरणार आहे. त्यामुळे ही पॅसेंजर सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

खासगी वाहनांनी प्रवास करण्याची वेळ

मागील महिन्यात परिवहन कर्मचाऱयांचा संप सुरू होता. त्यावेळी पॅसेंजर रेल्वे सुरू असल्याने काही प्रमाणात प्रवाशांची सोय झाली. सध्या कोरोनामुळे पुन्हा एकदा बस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पॅसेंजर सुरू झाल्यास प्रवाशांना ये-जा करणे सोयीचे होणार आहे. सध्या बस व पॅसेंजरही बंद असल्याने लोंढा, कॅसलरॉक, गोकाक, घटप्रभा, रायबाग या परिसरातील प्रवाशांवर पुन्हा एकदा मिळेल त्या खासगी वाहनांनी प्रवास करण्याची वेळ आली आहे.

Related Stories

कर्नाटक ‘कृषी सम्मान’च्या अंमलबजावणीत आघाडीवर

Amit Kulkarni

‘मस्की’ पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार कोरोना पॉझिटिव्ह

Amit Kulkarni

दिशा रवीच्या अटकेच्या निषेधार्थ विविध संघटनांची निदर्शने

triratna

आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करा; अन्यथा…

Amit Kulkarni

कर्नाटक: कोरोनामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत; सरकार फळांची ऑनलाईन विक्री करणार

Shankar_P

कर्नाटक: पोलीस दाम्पत्याची आत्महत्या

Shankar_P
error: Content is protected !!